Nandurbar News : नंदुरबार ः जिल्ह्यात यंदा मिरची पिकात फारसा नफा हाती आला नाही. त्यात आता उष्णता वाढत असतानाच पीक अंतिम स्थितीत आहे. जिल्ह्यात यंदा पीकलागवड अधिक होती. जूनपासून लागवड सुरू झाली होती. अनेकांनी पीक काढल्याची माहिती आहे.
नंदुरबार मिरचीसाठी देशभरात प्रसिद्ध आहे. मिरची लागवडीत काहीशी वाढ झाली होती. यामुळे यंदा बाजारही अस्थिर होता. जूनअखेरीस लागवड पूर्ण झाली. सुरुवातीला पीकस्थिती बरी होती. नंतर अतिपाऊस झाला. सुरुवातीला चांगल्या पावसाने वाढ, उगवण जोमात झाली. तसेच वाढही दिसत होती.
मिरची लागवड मागील वेळेस सुमारे २१०० हेक्टरवर झाली होती. यंदा सुमारे तीन हजार हेक्टरवर मिरची लागवड जिल्ह्यात झाली होती. नंदुरबारमधील कोठली, लहान शहादे, खोंडामळी, सुजालपूर, समशेरपूर, शहाद्यातील कुढावद, लोंढ्रा, धुरखेडा, म्हसावद, तळोद्यातील प्रतापपूर, रांझणी, बोरद आदी भागात मिरची लागवड अधिक असते.
चांगला पाऊस येईल या अपेक्षेने लागवड झाली. पण पावसाने पिकाची वाताहत झाली. म मिरची लागवड १५ जूनपर्यंत सुरू होती. यंदा जूनमध्ये पाऊसमान बरे होते. यामुळे लागवड सुरूच राहिली. अनेक भागांत पाण्याची समस्या होती. परंतु शेतकऱ्यांनी काटेकोर पाणी व्यवस्थापन करून लागवड केली. अनेकांचे पीक दीड महिन्याचे असतानाच नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी खते व पाण्याचे व्यवस्थापनही व्यवस्थित केले. यातून पीक वाचविले.
पाऊस सतत राहिल्याने अडचण आली. पीकवाढ थांबली. यंदा तळोदा व शहादा भागात मिरची लागवड अधिक झाली होती. लांब व आखूड-तिखट प्रकारच्या वाणांना लागवडीसंबंधी शेतकऱ्यांनी पसंती दिली होती. नंदुरबारमध्ये कोठली व लगत अधिकची मिरची लागवड झाली. मागील वेळेस कमी पाऊस होता. त्यात पिकाची हानी झाली. यंदा नंदुरबारमधील लागवड कमी होईल, असा अंदाज होता. परंतु नंदुरबारमधील लागवड वाढली. पुढे बाजारातही अधिक मिरची आवकेने अडचणी आल्या.
अनेकांची करार शेती
अनेक शेतकऱ्यांनी खरेदीदारांशी करार करून लागवड केली होती. निर्यातक्षम मिरची उत्पादन करून तिची पाठवणूक आखातात करण्यासंबंधी हे करार काही शेतकऱ्यांनी केले. गुजरातमधील खरेदीदारांशी हे करार झाले. प्रचलित दरांपेक्षा अधिकचे दर निर्यातीच्या मिरचीस मिळतात. यामुळे हे करार अनेकांनी केले. यात दर्जेदार निविष्ठांचा पुरवठा व तांत्रिक मार्गदर्शनही शेतकऱ्यांना करण्यात आले. पण प्रतिकूल स्थितीने पीक खराब झाले. अनेक शेतकऱ्यांनी पीक काढले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.