Chilli Production : निर्यातक्षम मिरची उत्पादनासाठी पस्तीस एकरांवर प्रात्यक्षिके

Agriculture Demonstrations : परभणी जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील १२ गावांतील ३८ शेतकऱ्यांच्या ३५ एकर क्षेत्रावर मिरची लागवड करण्यात आली आहे.
Chilli Farming
Chilli FarmingAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : हिरव्या मिरची निर्यातीतून शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला गती मिळावी, या उद्देशाने परभणी कृषी विज्ञान केंद्रामार्फत यंदा (२०२४) निर्यातक्षम उत्पादन तंत्रज्ञानावर आधारित प्रात्यक्षिक प्रकल्पाअंतर्गत परभणी जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील १२ गावांतील ३८ शेतकऱ्यांच्या ३५ एकर क्षेत्रावर मिरची लागवड करण्यात आली आहे.

या निर्यातक्षम मिरची लागवड प्रकल्पामधुन शेतकऱ्यांना विदेशी बाजारपेठेची ओळख व्हावी. जागतिक दर्जाची कृषी उत्पादने घेण्यासाठी शेतकरी तांत्रिकदृष्ट्या सक्षम करणे हे या प्रकल्पाचे उदिष्ट आहे.

Chilli Farming
Chilli Farming : व्यावसायिक ढोबळी मिरची उत्पादनातून साधली प्रगती

या अंतर्गत परभणी जिल्ह्यातील उमरी, भोगाव साबळे (ता. परभणी), शिंदे टाकळी (ता. सेलू), मानवत, मानोली, उक्कलगाव, रुढी, सोमठाणा (ता. मानवत), चाटेपिंपळगाव (ता. पाथरी), नाव्हा, पेठपिंपळगाव, वानवडी (ता. पालम) या १२ गावांतील ३८ शेतकऱ्यांच्या शेतावर ३५ एकरवर मिरचीची लागवड करण्यात आली आहे.

याअंतर्गत शेतकऱ्यांना मिरची पिकांतील खते, एकात्मिक कीड व रोग नियंत्रणाच्या जैविक व भौतिक पद्धती, रासायनिक कीटकनाशकांचा वापर, कीटकनाशकांचे अंश मुक्त मालाची तोडणी, निर्यातीबाबतच्या तांत्रिक बाबी, फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र यावर माहिती दिली जात आहे.

Chilli Farming
Chilli Crop Farming : दुष्काळाचे आव्हान समजले; मिरची पीक यशस्वी केले

या प्रकल्पात उत्पादित हिरवी मिरचीची सानुप्रिया शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत बाजारभावापेक्षा जास्त दराने खरेदी करून निर्यात करण्यात येणार आहे.सोमवारी (ता. १२) भोगाव साबळे (ता. परभणी) येथे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शन शेतकरी प्रशिक्षण व प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ अमित तुपे, ज्ञानेश्वर पवार यांनी निर्यातक्षम मिरची लागवड तंत्रज्ञान याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. कुंडलिक खुपसे, नामदेव काळे यांच्यासरह परभणी, मानवत, पालममधील शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com