Chili Cultivation : नंदुरबारात मिरची लागवड पूर्ण; लागवडीत वाढ

Chili Production : मिरची लागवड मागील वेळेस सुमारे २१०० हेक्टरवर झाली होती. यंदा सुमारे अडीच हजार हेक्टरवर मिरची लागवड जिल्ह्यात झाली आहे.
Chili
ChiliAgrowon
Published on
Updated on

Nandurbar News : जिल्ह्यात यंदा मिरची लागवडीत काहीशी वाढ झाली आहे. लागवड पूर्ण झाली असून, पीकस्थिती बरी आहे. चांगल्या पावसाने उगवण जोमात झाली. तसेच वाढही दिसत आहे.

मिरची लागवड मागील वेळेस सुमारे २१०० हेक्टरवर झाली होती. यंदा सुमारे अडीच हजार हेक्टरवर मिरची लागवड जिल्ह्यात झाली आहे. नंदुरबारातील कोठली, लहान शहादे, खोंडामळी, सुजालपूर, समशेरपूर, शहाद्यातील कुढावद, लोंढ्रा, धुरखेडा, म्हसावद, तळोद्यातील प्रतापपूर, रांझणी, बोरद आदी भागात मिरची लागवड झाली आहे. लागवडीत काहीशी वाढ झाली आहे.

चांगला पाऊस येईल, या अपेक्षेने लागवड झाली. लागवडीस १ जूनपासून सुरुवात झाली आहे. ही लागवड १५ जूनपर्यंत सुरू होती. यंदा जूनमध्ये पाऊसमान बरे होते. यामुळे लागवड सुरूच राहीली. अनेक भागांत पाण्याची समस्या होती. परंतु शेतकऱ्यांनी काटेकोर पाणी व्यवस्थापन करून लागवड केली.

Chili
Red Chili Market : लाल मिरचीच्या दरात घसरण

अनेकांचे पीक आता दीड महिन्याचे झाले आहे. तर काही शेतकऱ्यांचे पीक ४० दिवसांचे आहे. पीकस्थिती बरी आहे. कारण पाऊस येत आहे. तसेच खते व पाण्याचे व्यवस्थापनही व्यवस्थित केले जात आहे. पाऊस असल्याने वाफसा स्थिती कायम आहे. यामुळे पाणी देण्याची सध्या गरज नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

यंदा तळोदा व शहादा भागांत मिरची लागवड अधिक झाली आहे. लांब व आखूड - तिखट प्रकारच्या वाणांना लागवडीसंबंधी शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. नंदुरबारात कोठली व लगत अधिकची मिरची लागवड झाली आहे. मागील वेळेस कमी पाऊस होता. यंदा नंदुरबारातील लागवड कमी होईल, असा अंदाज होता. परंतु नंदुरबारातील लागवड स्थिर आहे. दुसरीकडे शहादा व तळोदा भागात अनेक शेतकऱ्यांनी नव्याने मिरची लागवड केली आहे.

Chili
Red Chili Rate : नगरला लाल मिरचीला १८ हजार रुपयांपर्यंत दर

अनेकांची करार शेती

अनेक शेतकऱ्यांनी खरेदीदारांशी करार करून लागवड केली आहे. निर्यातक्षम मिरची उत्पादन करून तिची पाठवणूक आखातात करण्यासंबंधी हे करार काही शेतकऱ्यांनी केले आहेत. गुजरातमधील खरेदीदारांशी हे करार झाले आहेत. प्रचलित दरांपेक्षा अधिकचे दर निर्यातीच्या मिरचीस मिळतात. यामुळे हे करार अनेकांनी केले आहे.

यात दर्जेदार निविष्ठांचा पुरवठा व तांत्रिक मार्गदर्शनही शेतकऱ्यांना केले जाते, अशी माहिती मिळाली. या करारात आखूड प्रकारच्या तिखट मिरचीची लागवड अधिकची झाली आहे. हिरव्या मिरचीची काढणी यात अधिक केली जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com