Waghnakhe Agrowon
ॲग्रो विशेष

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे शुक्रवारी साताऱ्यात

Waghnakhe in Satara : छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे शाहूनगरी सातारा येथे शुक्रवारी (ता. १९) प्रदर्शनासाठी दाखल होणार आहेत.

Team Agrowon

Satara News : छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे शाहूनगरी सातारा येथे शुक्रवारी (ता. १९) प्रदर्शनासाठी दाखल होणार आहेत.

या ऐतिहासिक घटनेचे स्वागत करण्यासाठी जिल्हा सज्ज असून, हा सोहळा अत्यंत दिमाखदार व राजेशाही थाटात व्हावा, यासाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी करावी, असे आदेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

स्वागताचे नियोजन करण्याची प्रशासनाची बैठक पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या वेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यासह विविध विभाग प्रमुखांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीनंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी ‍जितेंद्र डुडी व इतर प्रमुख अधिकाऱ्यांसह छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन दालनांची पाहणी केली व सूचना केल्या. या वेळी अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT