Nilesh Lanke News : खा. निलेश लंकेंचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन; शेतकऱ्यांना आवाहन

मोर्चाची प्रशासनाकडून योग्य दखल घेतली गेली नाही. त्यामुळे लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे.
Nilesh Lanke Protest
Nilesh Lanke ProtestAgrowon

शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. दूध आणि कांदा दरवाढीसाठी लंके यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता.५) महाविकास आघाडीनं जनआक्रोश मोर्चा काढला. परंतु मोर्चाची प्रशासनाकडून योग्य दखल घेतली गेली नाही. त्यामुळे लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे.

दरम्यान उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील चर्चा करण्यासाठी आले होते. विषयांचं गांभीर्याने पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चेसाठी यावं, अशी मागणी लंके यांनी केली आहे. परंतु जिल्हाधिकारी चर्चेसाठी आले नाही. त्यामुळे जोवर चर्चा होत नाही तोवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय लंके यांनी जाहिर केला आहे.

खा. लंके म्हणाले, "या सरकारमधील मुजोर अधिकारी मोर्चाची दखल घ्यायला आले नाहीत. आमची शेतमालाच्या हमीभावाची मागणी आहे. परंतु प्रशासन मोर्चाची दखल घेत नाही. त्यामुळे उद्या (शनिवारी) जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी गोधन घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजर व्हावं." असं आवाहन लंके यांनी केलं आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयामुळे कांदा आणि दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्क लावलेलं आहे. तसेच एनसीसीएफ आणि नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदीचा गैरव्यवहार केल्याचेही उघडकीस आले आहे. तर मागील वर्षभरापासून दूध उत्पादक शेतकरी खाजगी कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे मेटाकुटीला आला आहे. दूधाला ४० रुपये प्रतिलिटरचा दर मिळावा, या मागणीसाठी राज्यातील विविध भागात शेतकरी आंदोलन करत आहेत.

Nilesh Lanke Protest
Nilesh Lanke : दूध आणि कांदा दरवाढीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर खा. लंकेंचा मोर्चा; कार्यकर्ते व पोलिस भिडले!

दरम्यान, लंके यांनी दूध आणि कांदा दरवाढीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा धडकला त्यावेळी लंके यांचे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी मोर्चात गोंधळ उडाला. दुपारपासून लंके यांच्यासोबत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com