Chhatrapati Shivaji Maharaj Agrowon
ॲग्रो विशेष

Shivaji Maharaj History: लोककल्याणकारी राजा!

Welfare King of India: छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवनभर पोटच्या पोराप्रमाणे रयतेची काळजी घेतली. रयतेच्या कल्याणासाठी त्यांनी आपल्या जीवनात अनेक धाडसी विचार मांडले. ते विचार प्रत्यक्षात अमलात आणताना स्वतःपासून सुरुवात केली.

Team Agrowon

सौ. सुरेखा बोऱ्हाडे

First Maratha King in India: छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे असामान्य बुद्धिमत्तेचे आणि अलौकिक शौर्य असणारे जागतिक पातळीवरील एक सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्त्व त्यांचे संपूर्ण जीवन एक संघर्ष यात्रा आहे. त्यांनी केलेला संघर्ष हा राजा होण्याच्या हेतूसाठी नव्हता तर राष्ट्रातील भूमिपुत्रांना परकीय सत्तेच्या गुलामीतून मुक्त करणे, गोरगरीब आणि उपेक्षित लोकांना त्यांचे हक्क मिळवून देणे, त्यांच्या जीवनात स्थैर्य, शांतता आणणे आणि त्यांचे जीवन भयमुक्त करण्यासाठी, त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण करण्यासाठी होता. महाराजांनी ज्या अनेक लढाया केल्या त्यापेक्षाही सामाजिक क्षेत्रात घडवलेली क्रांती आणि त्यात मिळवलेले विजय हे परिवर्तनवादी चळवळीचा पाया भरणारे ठरले. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे लोक कल्याणकारी रयतेचे राजे झाले!

शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी सह्याद्री पर्वत रांगेतील शिवनेरी किल्ल्यावर झाला. वडील शहाजीराजे भोसले यांचे शौर्य आणि विवेक त्यांच्यामध्ये होता. बालपणापासून आई जिजाबाईसाहेब यांची शिकवण आणि संस्कार यावर महाराजांची जडणघडण झाली. मुघल आणि इतर शत्रूबरोबर दोन हात करताना आपल्या रयतेच्या सुरक्षेसाठी आणि विकासासाठी त्यांनी बालपणापासून कार्य करण्यास सुरुवात केली. त्यांच्या जीवन कार्यातून त्यांची असामान्य बुद्धी, शौर्य, धैर्य, चातुर्य, युक्तिवाद, मुत्सद्दीपणा, जिज्ञासूपणा, पराक्रम, सहिष्णुता, राष्ट्रप्रेम, रयतेवरचे प्रेम असे विविध गुण दिसून येतात. लहानशा जहागिरीपासून सुरुवात करून स्वकर्तृत्वावर त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्य उभे केले.

ध्यास रयतेच्या कल्याणाचा

महाराज हे उत्तम प्रशासक होते. महाराजांचे प्रशासन लोकाभिमुख आणि भ्रष्टाचारमुक्त होते. जनहितास प्राधान्य देणारी राजव्यवस्था त्यांनी वसवली. राज्यकारभाराच्या सोयीसाठी अष्टप्रधान मंडळ नेमले होते. राज्याचे तीन भाग केले होते. महाराजांनी भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जहागीर देण्याची पद्धत बंद करून सैनिकांना वेतन म्हणून रोख रक्कम द्यायला सुरुवात केली. जमिनीची पाहणी करूनच कर आकारणी केली जात असे. शिवाजी महाराज उत्तम रणकौशल्य असलेले सेनानी होते. त्यांनी एक कार्यक्षम, शिस्तबद्ध खडे लष्कर निर्मिले होते. रयतेचे कल्याण हेच ब्रीद मानून त्यांनी अनेक युगप्रवर्तक निर्णय घेतले. त्या काळात महाराजांनी जमिनीचे राष्ट्रीयीकरण करून कसेल त्याला जमीन ही पद्धत अमलात आणली. भ्रष्टाचार, बदअमल करणाऱ्यांना महाराजांनी कठोर शिक्षा करून शिस्त निर्माण केली.

शेतीला मिळाली ऊर्जितावस्था

देशावर सागरी मार्गाने आक्रमण होऊ शकते, याचा अंदाज घेऊन धर्ममार्तंडांनी घातलेल्या अंधश्रद्धेच्या भीतीला भीक न घालता देशहितासाठी सागरी किल्ले आणि सुसज्ज आरमार उभे केले. समाजातील अस्पृश्यता, जातिभेद निवारण्यासाठी महाराजांनी जिजाबाई साहेबांच्या साक्षीने दलितांना मंदिरात प्रवेश मिळवून दिला. सर्वांना समान वेश, समान पगार, समान प्रतिष्ठा,

एकत्र भोजन यातून मोठी सामाजिक क्रांती केली. समाज परिवर्तनाचे मोठे काम केले. चोर, अपराधी म्हणून हिणवल्या गेलेल्या रामोशी समाजाला गुप्तहेर खात्यात सन्मानाची नोकरी देऊन सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. गुणी, कर्तृत्ववान लोकांना किल्लेदारी दिली. लोकांची उपासमार बंद होऊन, दोन वेळचे अन्न मिळावे म्हणून महाराजांनी कृषी क्षेत्राला प्रोत्साहन दिले. स्वराज्यात सामूहिक शेती पद्धत सुरू केली. शेतकऱ्यांना सरकारातून बी-बियाणे, अवजारे आणि पैसा देऊन शेतीला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली.

फळबागांना प्रोत्साहन दिले. गावोगावी धरणे, तलाव बांधले. पाणी आडवा पाणी जिरवा हे धोरण राबविण्यासाठी प्रजेला प्रोत्साहन दिले. महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची सन्मानाने पाठवणी केली. त्यांचे स्त्रियांबद्दलचे सन्मानाचे धोरण आदर्शवत आहे. महाराजांनी राज्याच्या तिजोरीचा मोठा भाग प्रशासनावर खर्च करण्यापेक्षा जनकल्याणासाठी खर्च केला. त्यांनी आयुष्यात सर्वांत जास्त प्रेम केलं ते मावळ्यांवर आणि सर्वांत जास्त कष्ट उपसले ते सर्व सामान्य रयतेच्या कल्याणाकरिता!

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्मिलेले हिंदवी स्वराज्य अवघ्यांचे आहे, सर्व जाती-पातींनी ते रक्षावे, या उद्देशाने निर्मिले ते खऱ्या अर्थाने सर्व जातिधर्माच्या एकदेशीय स्वकीय प्रजेचे लोक कल्याणकारी राज्य ठरले!

९१५८७७४२४४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: तुरीचा बाजार मंदीतच; हळदीला मर्यादीत उठाव, कांदा स्थिर, गवार तेजीत, तर कोबीची आवक कायम!

Soil Health : जमिनीचे आरोग्य सांभाळणे गरजेचे

Nagnathanna Nayakvadi : नागनाथअण्णांसारख्या क्रांतिकारकांमुळे देशाला स्वातंत्र्य

Wild Boar : रानडुकराला उपद्रवी वन्य प्राणी घोषित करा

Lumpy Skin Disease: पुण्यात 'लम्पी'चा विळखा; सुप्रिया सुळेंची महापालिका आयुक्तांना उपाययोजनांची पत्राद्वारे विनंती

SCROLL FOR NEXT