Agricultural Development : सामूहिक शेतीचे बळ, भिडीकरांना देई फळ !

Community Farming : भिडी (ता. देवळी, जि. वर्धा) गावातील शेतकऱ्यांनी गावात ‘भिडी शेतकरी समूहाची स्थापना झाली. सामूहिक शेतीसह सिंचन, महिला सबलीकरण, आधुनिक पीक पद्धती, यांत्रिकीकरण, पूरक व्यवसाय, ग्रामविकास अशा अनेक बाबींवर हा समूह काम करत आहे. सामूहिक विकासाचा ‘भिडी पॅटर्न’ निर्माण करून इतरांसाठी ते प्रेरणास्रोत ठरत आहेत.
Agricultural Development
Agricultural DevelopmentAgrowon
Published on
Updated on

विनोद इंगोले

Success Stories of Bhidikars through Community Farming : वर्धा-यवतमाळ मार्गावर वसलेल्या भिडी गावात सोयाबीन, कपाशी, तूर, गहू, हरभरा यांसारखी पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा होता. लोअर वर्धा अंतर्गत उपकालवा एक ते तीन (शिरपूर, अंदूरी, भिडी) आहे. या तीन कालव्यांच्या माध्यमातून मुबलक पाणी मिळते. पारंपरिक पिकांची लागवड व बाजारात मिळणारा दर त्यासोबतच हवामानातील बदलामुळे देखील अशा पिकाच्या लागवडीत आव्हाने वाढली होती.

विविध अडचणींवर मात करण्यासाठी गजानन फाळे, नीलेश काळे, उमेश काळे, अजय झाडे, सचिन गायकवाड, जयंत डफडे, अनुप डफडे यांनी एकत्रित शेतकरी समूहाची संकल्पना मांडली. याच काळात राज्य शासनाकडून गटशेती योजना जाहीर झाली होती. त्या अंतर्गत ‘आत्मा’कडे ‘भिडी शेतकरी समूह’ अशी नोंदणी करण्यात आली. २०१७ मध्ये परिवर्तनाचे हे पाऊल पडले. या समूहाचे अध्यक्ष अजय झाडे, सचिव गजानन फाळे यांच्यासह तब्बल २० सदस्य आहेत.

Agricultural Development
Agriculture Minister Manikrao Kokate : कृषिमंत्र्यांच्या रडारवर ‘गुणनियंत्रण’

सामूहिक सिंचनाचा प्रयोग

भिडी शेतकरी समूहाने सामूहिक सिंचनाचा आदर्श असा प्रकल्प राबविला आहे. गटातील सदस्य असलेल्या सचिन गायकवाड यांची शेती वीस वर्षांसाठी करारावर केली आहे. या पाच एकर शेतात सामूहिक विहीर खोदण्यात आली आहे. पाईपद्वारे सिंचन या ठिकाणी होते. ९ शेतकरी या विहिरीतील पाण्याचा लाभ घेतात. या माध्यमातून ७५ एकर शेती सिंचनाखाली आणणे शक्‍य झाले आहे. अशाप्रकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प या गावात राबविण्यात आला. शेडनेटची उभी राहिली चळवळ

Agricultural Development
Agriculture Irrigation : ‘पुरंदर’च्या पाण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षाच

त्यानंतरच्या टप्प्यात शेडनेटसारखी संरक्षित शेती फायद्याचे असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यावर लक्ष केंद्रित करीत शेडनेटमधील पीकपद्धती, बाजारपेठ या बाबींचा अभ्यास करण्यात आला. त्यातूनच गावात दहा शेडनेट उभे राहिले. शेडनेट उभारणीसाठी १४ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान पोकरा प्रकल्पातून मिळते. डीबीटीच्या माध्यमातून अनुदान खात्यात जमा होत असले, तरी त्यापूर्वी उभारणीकामी संपूर्ण खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो. परंतु इतका खर्च करणे शेतकऱ्यांना शक्‍य नव्हते. ही अडचण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर मांडली. कंत्राटदाराकडे त्यांनी हमी घेतल्यावर शेडनेट उभारणीचे काम मार्गी लागले. एक शेडनेट हे एक एकर क्षेत्रावर, एक ४० गुंठे क्षेत्रावर तर उर्वरित आठ शेडनेट हे २० गुंठे क्षेत्रावर उभारले गेले.

...अशी शोधली बाजारपेठ

पहिल्यावर्षी काकडी, तर दोघा शेडनेटधारकांनी ढोबळी मिरचीचे पीक घेतले. नागपूर, वर्धा, यवतमाळ या बाजारपेठांमध्ये शेतीमालाची विक्री होते, असे भिडी शेतकरी गटाचे अध्यक्ष अजय झाडे यांनी सांगितले. वर्षभरात दोन पिके शेडनेटमध्ये घेतली जातात. या दोन्ही हंगामांत काकडी घेण्यावर भर राहतो. फेब्रुवारी-मार्च तसेच सप्टेंबर असा हा हंगाम राहतो. या पिकातून खर्च वजा जाता एका हंगामातून सव्वा ते दिड लाख रुपयांचे उत्पन्न होते. परिणामी, गटातील शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यास मदत झाली आहे.

( - अजय झाडे, अध्यक्ष, भिडी शेतकरी समूह ९४०३३३७७४०)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com