Water Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Sambhajinagar/Hingoli/Pune Water shortage : संभाजीनगरला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली, हिंगोली जिल्हा पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर

Sambhajinagar/Hingoli/Pune Water shortage News : यंदा राज्याच्या विविध भागात भीषण पाणीटंचाई भासत असून हिंगोली जिल्हा पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. तर ऐण दुष्काळाच्या टप्प्यात संभाजीनगरला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली आहे. तर पुणेकरांचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्याच्या अनेक जिल्ह्यांना गेल्या वर्षी कमी पडलेल्या पावसाचा फटका बसत आहे. यामुळे यंदा विविध जिल्ह्यांमध्ये दुष्काळाचे सावट घोंगावत असून छत्रपती संभाजीनगर, हिंगोली आणि पुणेकरांच्या चिंतेत भर पडणार आहे. संभाजीनगर, हिंगोली आणि पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असून पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. संभाजीनगरमध्ये दुष्काळात तेरावा महिना म्हणावा तशी अवस्था झाली आहे. तर हिंगोली जिल्ह्यातील धरणांची तळ गाठण्याकडे वाटचाल सुरू आहे. यादरम्यान पुणे शहराला होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी (ता.२४) बंद राहणार आहे. यामुळे या तिनही जिल्ह्यांमधील सर्वसामान्य जनता चिंताग्रस्त झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर

संभाजीनगर जिल्ह्याला वाढत्या उष्णतेमुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून येथे शहराला ५ ते ६ दिवसांनी पाणीपुरवठा केला जात आहे. यादरम्यान येथे उजनी धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या १२०० मिलीमिटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती लागली आहे. यामुळे ऐण दुष्काळाच्या तेराव्या महिन्यात लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

नागरिकांमधून संताप

उजनी धरणातील पाणी सध्या फक्त पिण्यासाठी आरक्षित केले असतानाच पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागली आहे. यामुळे उष्णतेच्या झळा सोसणाऱ्या शहरावासियांमध्ये संतापाची लाट आहे. येथे शहरातील अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

पाणीटँकरचे दर महागले

शहारात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरचे दरही महागल्याचे समोर आले आहे. यामुळे आधीच पाणीटंचाईने चिंताग्रस्त असणाऱ्या सर्वसामान्यांना टँकरच्या वाढत्या दरांनी शॉक दिला आहे. येथे २ हजार लिटर टँकरला ७०० रूपये आणि ५ हजार लिटरसाठी १ हजार रूपये मोजावे लागत आहेत. तर वाढलेले हे भाव पाण्याची मागणी जास्त आणि पुरवठा कमी यामुळेच भडकल्याचे समोर येत आहे.

हिंगोली पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर

छत्रपती संभाजीनगरप्रमाणेच हिंगोली जिल्ह्यातही मोठी पाणीटंचाई उद्भवली आहे. येथे असणाऱ्या २६ लघू प्रकल्पापैकी ११ प्रकल्प जोत्याखाली गेले आहेत. तर १३ प्रकल्पातील पाणीसाठी हा २५ टक्क्यांच्या आत आला आहे. यामुळे देखील जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीबाणी दिसत आहे. यामुळे येथील दुष्काळी गावांमधून कुपनलिका आणि विहरींचे अधिगृहन करण्यात आले आहे.

तसेच हिंगोली आणि परभणी आणि नांदेड शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या येलदरी, सिद्धेश्वर आणि ईसापूर धरणातील पाणीसाठा देखील ३० टक्क्यांच्या आत आला आहे. यामुळे हिंगोली आणि परभणी आणि नांदेड शहरामध्ये तीव्र पाणीटंचाई भासत आहे.

सध्या येलदरी धरणात २९ टक्के पाणीसाठा असून सिद्धेश्वर धरणाने तळ गाठला आहे. तर ईसापूर धरणात फक्त ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यात दिवसेंदिवस झापाट्याने घट होत आहे. यामुळे हिंगोली जिल्हा पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर असून मान्सूनकडे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे

पुणेकरांचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद

दरम्यान पुणे शहराला होणारा पाणीपुरवठा हा शुक्रवारी बंद राहणार असून येथे विद्युत, पंपींग व स्थापत्य विषयाशी निगडीत देखभाल दुरुस्तीचे कामे तातडीने करण्यात येणार आहेत. त्यामुळे शुक्रवार (ता.२४) शहरातील बहुतांश भागातील पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे. तर शनिवारी (ता.२४) रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

कोणत्या परिसरात मिळणार नाही पाणी

शहरातील पर्वती एमएलआर टाकी परिसर, पर्वती एचएलआर टाकी परिसर, पर्वती एलएलआर परिसर

वारजे जलकेंद्र अखत्यारीतील

चांदणी चौक टाकी, गांधी भवन टाकी परिसर, एस.एन.डी.टी. (एमएलआर) टाकी परिसर तसेच एस.एन.डी.टी. (एचएलआर) टाकी परिसर व चतुः श्रृंगी टाकी परिसर,

लष्कर जलकेंद्र रॉ वॉटर पंपिग व त्या अंतर्गत

ठाकरसी, बेकरहील, हायसर्व्हिस, रेसकोर्स, रामटेकडी व खराडी टाकी परिसर

होळकर जलकेंद्र व चिखली जलशुद्धीकरण केंद्र परिसरात देखील शुक्रवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 : आदिती तटकरेंचा विजय निश्चित; कोकणातील पहिला निकाल स्पष्ट

Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 : लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Poultry Processing Product : अबब! कडकनाथच्या अंड्यांपासून एवढी उत्पादने?

SCROLL FOR NEXT