Ai in Weather: हवामान बदला हा संपूर्ण जगासाठीच आता चिंतेचा विषय आहे. असे असले तरी हवामान बदलाचे सर्वाधिक चटके हे कृषिप्रधान भारत देशाला बसत आहेत. बदलत्या हवामानात नैसर्गिक आपत्तींची तीव्रता आणि वारंवारता देखील वाढली आहे. यात निसर्गात उघड्यावर केल्या जाणाऱ्या शेती व्यवसायाचे अतोनात नुकसान होत आहे. नैसर्गिक आपत्तींनी होणारे नुकसान हे कोण्या एका हंगामापुरते मर्यादित राहिले नाही, तर हंगामनिहाय बसलेली शेती, पीकपद्धतीची घडी विस्कळीत होण्यापर्यंत याचे परिणाम आता समोर येत आहेत. .बदलत्या हवामानाचा स्वभाव अभ्यासणे हे जगासमोरचे सर्वात मोठे आव्हान म्हणता येईल. हवामान बदलाच्या काळात अचूक अंदाजाचा वेध घेणे फारच जिकिरीचे ठरत आहे. अशा एकंदर परिस्थितीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरातून हवामानाचे अचूक अंदाज देण्याची यंत्रणा उभारली जाईल, असा विश्वास जागतिक हवामान संघटनेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल्ला मॅंडोस यांनी व्यक्त केला आहे. शिक्षण, आरोग्य, शेती अशा विविध क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा बोलबोला वाढत असताना याद्वारे हवामानाचे अचूक अंदाज वर्तविण्यात आले तर हे हवामान तज्ज्ञ, शेतकरी ते सर्वसामान्य नागरिक अशा सर्वांसाठीच दिलासादायक ठरेल. त्यामुळे याचे स्वागतच आहे..Climate Research: ‘एआय’द्वारे अचूक हवामान अंदाज यंत्रणा.जागतिक हवामान संघटना ही संयुक्त राष्ट्राची विशेष संस्था असून ती वातावरणीय विज्ञान, हवामानशास्त्र, जलविज्ञान, भूभौतिकशास्त्र या विषयांचा अभ्यास करते. विशेष म्हणजे ही संस्था १८७३ पासून (त्यावेळचे नाव आंतरराष्ट्रीय हवामान संघटना) हवामान डेटा संकलन, संशोधनात काम करते. महत्त्वाचे म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता प्रामुख्याने डेटा संशोधन-संकलन-विश्लेषणावर आधारीतच काम करीत असल्याने या सर्व अनुभव, माहितीचा उपयोग संस्थेला हवामानाचा अचूक अंदाज वर्तविण्यासाठी होणार आहे..Climate Change : हवामान बदलामुळे शेतीक्षेत्रावर दूरगामी परिणाम.सध्या हवामानाचा अंदाज हा आकाशाचा रंग, वाऱ्याची दिशा, हवेची गुणवत्ता ढगांची व्याप्ती यांच्या वेधशाळेत उपक्रमांद्वारे नोंदीसह अवकाशातून उपग्रहांद्वारे ढगांच्या प्रतिमा याद्वारे वर्तविला जातो. अर्थात सध्याच्या हवामान अंदाजात ज्ञान, विज्ञान आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेने हवामानाचा अंदाज वर्तविताना त्यात अनुभवाची भर पडणार आहे. ज्ञान, विज्ञान आणि अनुभव या तीन मुलभूत घटकांद्वारे हवामानाचा अचूक वेध आता घेता येऊ शकतो, हा आशावाद दुणावला आहे. .जागतिक हवामान संघटनेत हवामान अंदाजावर मागील १० वर्षांत सूक्ष्म, अतिसूक्ष्म पातळीवर अभ्यास, संशोधनाचे काम झालेले असताना कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे आणखी सूक्ष्म पातळीवर काम होणार आहे. जागतिक हवामान संघटनेचे १९३ देश सदस्य असताना सध्या मात्र यासाठी ७६ देशच एकत्र आले आहेत. खरे तर हवामानाच्या अभ्यासासाठी सर्व जगानेच आता एकत्र येणे गरजेचे आहे. पुढील दोन वर्षांत हवामान बदलांतील तीव्र चढ-उतारांच्या संशोधनासाठी तसेच ढगांच्या अभ्यासासाठी ‘सेंटर फॉर एक्सलन्स’ ‘आयआयटीएम’ पुणे येथे कार्यान्वित होणार असल्याने अतिवृष्टी, ढगफूट, विजा कोसळणे अशा नैसर्गिक आपत्तींचा अचूक अंदाज घेता येईल. त्यामुळे याद्वारे होणारी जीवित-वित्त हानी टाळता आली अथवा कमी करता आली तर हेही मोठी उपलब्धी म्हणता येईल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.