Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणूक कामात व्यस्त

Kolhapur Drought : कोल्हपूर जिल्ह्यात दोन तालुक्यात दुष्काळ जाहीर केला असला तरी अनेक तालुक्यात आता टँकरद्वारे पाण्याची मागणी होत आहे.
Kolhapur Water Shortage
Kolhapur Water Shortageagrowon

Kolhapur Drought Condition : कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावात पाण्याची टंचाई दिसून येत आहे. जिल्ह्यातील हातकणंगले आणि गडहिंग्लज या दोन तालुक्यात सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सध्या १५ वाड्या वस्त्यांवर सध्या भीषण पाणी टंचाई जाणवत आहे.

दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून विहिरी, विंधन विहिरी अधिग्रहण करणे, शक्य तिथे नवीन विंधन विहीर घेण्याच्या उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. याबाबत जिल्ह्यात कुठेही अंमलबजावणी झाली नसली तरी तयारी मात्र करण्यात आली आहे.

कागदावर आराखडा तयार करण्यात आला परंतु पिके पाण्याअभावी करत आहेत तर काही ठिकाणी रहिवाशांच्या घशाला कोरड पडण्याची वेळ आली आहे. अशातच लोकसभेच्या निवडणुकांमुळे तालुका, जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी निवडणूक प्रचारात दंग आहेत.

दुष्काळाची स्थिती गडद होत असल्याने नऊ तालुक्यांतील १५ वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. येथे टंचाई निवारण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कृती आराखडा तयार केला आहे. मात्र आराखड्यातील प्रस्तावित सर्व कामे प्रत्यक्षात सुरू नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

जिल्हा प्रशासन निवडणुकांच्या कामात दंग राहिल्याने टंचाई निवारण्याच्या उपाययोजना तातडीने करण्यासाठी पाठपुरावा होत नाही. अधिकाऱ्यांना गावपातळीवरील पाणी टंचाई पहायलाच गेले नसल्याने दुष्काळाची दाहकता पुरेशा प्रमाणात न कळाल्याने ते प्रस्ताव येऊ दे, पाण्याचे स्त्रोत तपासू, खासगी विहिरी, विंधन विहिरी अधिग्रहित करून, नवीन कूपनलिकेची खोदाई करू, असे सांगत आहेत.

Kolhapur Water Shortage
Drought Crisis : दुष्काळी भागात विहिरीतील गाळ काढण्याची कामे सुरू

सध्या जक्कनहट्टी, नामखोल, पारगड येथील पाच वसाहतीमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी प्रशासनाकडे झाली आहे. मात्र प्रशासनाकडून अजून एकही टँकर सुरु झालेला नाही. या वस्त्यांमध्ये नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आणि विहिरी आहेत. जलजीवन मिशन योजना पूर्ण झाल्यास येथे टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज नाही, असे पाणीपुरवठा विभाग अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे.

पाणीटंचाई तीव्र झालेल्या गाव, वाड्या, वस्त्यांची नावे:

आजरा : धनगरवाडा, मोरेवाडी, घागरवाडी, आंबार्डे,

शाहूवाडी : जाधववाडी.

राधानगरी : हुंबेवाडा.

भुदरगड : जोगेवाडी.

करवीर : कात्यायनी पार्क,

चंदगड : मजरे जट्टेवाडी, जक्कनहट्टी, नामखोल, पारगड.

पन्हाळा : धारवाडी, जाखले, कोतमिरवाडी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com