Sugarcane  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : छत्रपती कारखान्याचे १० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

Sugarcane Crushing : चालू वर्षीच्या गळीत गळीत हंगामासाठी छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ८ लाख टन ऊस गळितासाठी उपलब्ध होईल.

Team Agrowon

Pune News : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने सन २०२४-२५च्या गळीत हंगामामध्ये १० लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी दिली.

कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन शुक्रवारी (ता. १२) केले. त्यावेळी त्यांनी माहिती दिली. यावेळी संचालक बाळासाहेब पाटील, नारायण कोळेकर, राजेंद्र गावडे, संतोष ढवाण, रसिक सरक, निवृत्ती सोनवणे, कुंदन देवकाते, माजी संचालक भाऊसाहेब सपकळ, कार्यकारी संचालक अशोक जाधव, वर्क्स मॅनेजर प्रसाद राक्षे, फायनान्स मॅनेजर हनुमंत करवर, मुख्य शेतकी अधिकारी जालिंदर शिंदे, सिव्हिल इंजिनिअर तानाजी खराडे, डेप्युटी चीफ इंजिनिअर अण्णासाहेब कदम, सुरक्षा अधिकारी दत्तात्रेय पिसे, पर्चेस ऑफिसर वीरेंद्र वाबळे, शुगर वर्कर्स युनियनचे अध्यक्ष युवराज रणवरे, सतीश गावडे, नंदकुमार चांदगुडे, गजानन कदम, सुहास निंबाळकर आदी उपस्थित होते.

यावेळी काटे व पाटील यांनी सांगितले की, चालू वर्षीच्या गळीत गळीत हंगामासाठी छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ८ लाख टन ऊस गळितासाठी उपलब्ध होईल. कार्यक्षेत्राबाहेरील गेटकेनचा २ लाख टन, असा १० लाख टन उसाचे गाळप करण्याचे संचालक मंडळाने ठरविले आहे.

त्या दृष्टीने ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेचे नियोजन सुरु आहे. आतापर्यंत ३८६ ट्रॅक्टरचे, १११० बैलगाडीचे व ५६८ ट्रॅक्टरगाडीचे करार पूर्ण झाले आहेत. कारखान्यातील मशिनरी ओव्हरहॉलिंग व रिपेअरिंगची कामे प्रगतिपथावर आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन्ही प्लॅन्ट गाळपासाठी सज्ज होतील.

चालू वर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये पावसाने वेळेवर आणि चांगली सुरुवात केली आहे. त्यामुळे उसाच्या उपलब्धतेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामामध्ये ७ लाख २९ हजार ५८१ टन उसाचे गाळप केले होते. चालू वर्षीही सर्वांनी आपल्या कारखान्यास गळितास ऊस देऊन सहकार्य करावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marathwada Drought : मराठवाड्यासाठी कोकणातून ७० टीएमसी पाणी आणणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

Marathwada’s Drought Challenge: मराठवाडा दुष्काळमुक्त कधी होणार?

Rural Entrepreneurship: ग्रामीण उद्योजकतेला दिली बळकटी

Konkan Weekly Market: रानभाज्यांसह कोकणी शेतीमालासाठी प्रसिद्ध गावठी आठवडी बाजार

Sugar Industry: साखर उद्योगाला अल्प दिलासा

SCROLL FOR NEXT