Onion Export Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Processing Industry : कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याची गरज

Chhagan Bhujbal : कांद्याच्या दराबाबत अनेक वेळा प्रश्‍न निर्माण होतात. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अधिक दर मिळण्यासाठी कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याची नितांत आवश्यकता आहे.

Team Agrowon

Nashik News : ‘‘कांद्याच्या दराबाबत अनेक वेळा प्रश्‍न निर्माण होतात. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अधिक दर मिळण्यासाठी कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याची नितांत आवश्यकता आहे. या प्रक्रिया उद्योगासाठी बाजार समितीने देखील लक्ष घालून या प्रकल्पाला चालना देण्याची गरज आहे,’’ असे प्रतिपादन आमदार छगन भुजबळ यांनी केले.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विंचूर उपबाजारात शुक्रवारी (ता. २४) विविध विकासकामांचे भूमिपूजन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती गणेश डोमाडे, संचालक पंढरीनाथ थोरे, डी. के. जगताप, जयदत्त होळकर, डॉ. श्रीकांत आवारे, राजेंद्र डोखळे, बाजार समिती सचिव नरेंद्र वाढवणे आदींसह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, की कांदा पावडरसारखा चांगला उद्योग शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून केला तर इतर देशांमध्ये त्याला मोठी मागणी आहे. या उद्योगाला चालना देण्यासाठी बाजार समितीने विशेष लक्ष देऊन प्रक्रिया उद्योगाला चालना द्यावी.

दिवसेंदिवस विंचूर उपबाजार आवारावर शेतीमाल आवकेत वाढ होत असल्याने बाजार समितीस सध्या असलेली जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे बाजार समितीने मौजे सुभाषनगर शिवारातील ८ हेक्टर २१.२९ एकर जागा शासकीय दराने संपादित करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.

‘२० टक्के निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार’

‘‘केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात शुल्क २० टक्के लादलेले आहे. त्याचा परिणाम निर्यातीवर होत असून निर्यात शुल्क शून्य केल्यास त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल,’’ असे आमदार छगन भुजबळ म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Anudan: नांदेडमध्ये कृषी यांत्रिकीकरणातून १२.७० कोटींचे अनुदान वितरित

Raju Shetti: बोगस आणि निकृष्ट खते, कीडनाशकांमुळे आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान, राजू शेट्टींकडून कारवाईची मागणी

Maharashtra Khat Satha: खरिपासाठी १.५० लाख टन युरिया, २५ हजार टन डीएपीचा संरक्षित साठा

Pani Tanchai Upay: पाणी टंचाईवर मात करत पेणच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Bhat Sheti in Maharashtra: सूर्या प्रकल्पामुळे उन्हाळी भातशेती बहरली

SCROLL FOR NEXT