Pesticides Agrowon
ॲग्रो विशेष

Pesticide Information : कीटकनाशक माहितीपत्रकातील अक्षरांच्या आकार तपासणार

Pesticide Use : कीटकनाशकांच्या पॅकिंगमध्ये आतील बाजूस देण्यात येणाऱ्या लिफलेट (माहितीपत्रक) वरील अक्षरांचा आकार (फॉंट साईज) वाचनीय नसतो.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Yavatmal News : कीटकनाशकांच्या पॅकिंगमध्ये आतील बाजूस देण्यात येणाऱ्या लिफलेट (माहितीपत्रक) वरील अक्षरांचा आकार (फॉंट साईज) वाचनीय नसतो. त्यातून शेतकऱ्यांच्या फसवणुकीची शक्‍यता लक्षात घेता राज्याच्या निविष्ठा व गुणनियंत्रण संचालकांनी या संबंधी राज्यभरात पडताळणीचे आदेश दिले आहेत.

कीटकनाशकांसंदर्भातील तांत्रिक माहिती, विषबाधा झाल्यास करावयाच्या उपाययोजना, त्याचे पाण्यातील प्रमाण किती असावे, अशा प्रकारची माहिती कीटकनाशक पॅकिंगच्या आतील बाजूस लिफलेटद्वारे दिली जाते.

अनेक भाषांमध्ये ही माहिती असते. त्याकरिता छोट्याशा कागदाचा वापर करण्यात येतो. ए-४ साईज आकाराच्या कागदापेक्षाही कमी आकाराचा कागद याकरिता वापरला जातो. त्यामुळे ही माहिती वाचता येत नाही. परिणामी या माहितीचा कोणताच उपयोग शेतकऱ्यांना होत नाही.

दरम्यान, शेतकरी संघटनेच्या तंत्रज्ञान आणि कृषी विस्तार आघाडीचे प्रमुख मिलिंद दामले यांनी निविष्ठा व गुणनियंत्रण संचालकांकडे हा मुद्दा मांडला. त्याची दखल घेत निविष्ठा व गुणनियंत्रण संचालकांनी राज्यातील सर्व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकाऱ्यांना कीटकनाशके लिफलेट तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. कीटकनाशक कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन आढळून आल्यास परवान्यावर कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्याचेही या पत्रात म्हटले आहे.

कीटकनाशकांच्या लिफलेटवर इंग्रजी किंवा स्थानिक अथवा राष्ट्रीय भाषा म्हणून हिंदी असावी. परंतु ती अनेक भाषांमध्ये असते. त्याची फॉंट साईज ८ असावी, असे केंद्राच्या धोरणात आहे. तसे पत्र केंद्राच्या कृषी मंत्रालयाकडून मला मिळाले होते. त्याचा आधार घेत राज्याच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाकडे पत्रव्यवहार केला. त्यांनी त्याची दखल घेत आता तपासणीचे निर्देश दिले आहेत.
- मिलिंद दामले, प्रमुख, शेतकरी संघटना, तंत्रज्ञान आणि कृषी विस्तार आघाडी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT