Crop Protection: रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू, कांदा तर उन्हाळी हंगामातील भात, भुईमूग अशा एकूण सहा पिकांच्या विमा नोंदणीचे काम सुरू झाले आहे. खरे तर सप्टेंबरमधील अतिवृष्टीने खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान झाल्यावर राज्यातील शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागले होते. दिवाळी संपल्यानंतर सर्वत्रच रब्बी हंगामातील पेरण्यांना वेग येतो. मात्र, ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यात पुन्हा पाऊस सुरू झाल्याने रब्बी हंगामासाठी जमिनीच्या तयारीपासून ते पीक पेरणीपर्यंतची कामे खोळंबली आहेत. .नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात देखील हा पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये रब्बी हंगामाबाबत आता चिंतेचे वातावरण आहे. सप्टेंबरमधील आणि आत्ताच्या पावसाने जमिनीत ओलाव्याचे प्रमाण भरपूर आहे. शिवाय धरणे, तलाव भरलेले आहेत. विहीर बोअरवेलची पाणी पातळी वाढलेली आहे. ही सर्व परिस्थिती रब्बी क्षेत्र वाढीस पूरक आहे..Rabi Sowing: मराठवाड्यात आजवर ७० हजार हेक्टरवरच पेरणी.निरभ्र आकाश, स्वच्छ सूर्यप्रकाश, थंड कोरडी हवा असे रब्बी हंगामातील वातावरण हरभरा, गव्हापासून सर्वच रब्बी पिकांना पोषक मानले जाते. शिवाय या हंगामात खरिपाच्या तुलनेत तणांबरोबर रोग-किडींचा प्रादुर्भाव देखील कमी असतो. त्यामुळे रब्बी हंगाम शेतकऱ्यांना आश्वासक वाटत होता..रब्बी हंगामात पीकविम्याची फारशी गरज शेतकऱ्यांना वाटत नव्हती. परंतु मागील चार-पाच वर्षांपासून नोव्हेंबर ते मार्चपर्यंत मॉन्सूनोत्तर पाऊस पडून रब्बी, उन्हाळी हंगामातील पिकांचेही नुकसान वाढले आहे. शिवाय अतिथंडी, गारपीट, धुके, तापमानातील अचानक मोठे चढ-उतार आदी नैसर्गिक आपत्तीही वाढल्या आहेत. त्यामुळे रब्बी - उन्हाळी हंगामात देखील पीकविम्याचे संरक्षण पिकांना देणे आता गरजेचे झाले आहे..असे असताना रब्बी हंगामात पीककर्ज तसेच पीकविमा संरक्षण याबाबत शेतकऱ्यांमध्ये अजूनही फारशी जाणीव जागृती नाही. हे काम कृषी विभागासह विमा कंपन्या, बॅंका आणि केंद्र-राज्य शासन अशा सर्वांना मिळून करावे लागेल. या सर्व घटकांनी एकत्रित रब्बी पीककर्ज आणि पीकविमा प्रबोधनाची मोहीम हाती घ्यायला हवी. रब्बी हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये झालेले नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्तीत काढणी पश्चात झालेले नुकसान, तसेच पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट यामध्ये आपल्या पिकांना संरक्षण मिळू शकते, हे शेतकऱ्यांना या मोहिमेद्वारे पटवून द्यावे लागेल..Rabi Crop Insurance: रब्बी पीकविमा नोंदणीचे काम सुरू.पीकविमा नोंदणीत नेहमीच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता ते प्रत्यक्ष नोंदणीच्या वेळी सर्व्हर डाऊन अशा अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. त्या अडचणी दूर करण्याचे काम यातील संबंधित सर्व घटकांना करावे लागेल. शेतकऱ्यांनी सुद्धा पीकविम्यासाठी पुढाकार घेऊन पीकनिहाय निर्धारीत वेळेत विमा भरून आपले पीक संरक्षित करायला हवे. पीकविम्यात नुकसान भरपाई मिळण्यासाठीची प्रक्रिया ही खूपच गुंतागुंतीची आहे..विशेष म्हणजे नुकसानीचे पाहणी पंचनामे वेळोवेळी होत नाहीत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पीकविमा काढून नुकसान झाले तरी त्यांना भरपाई मिळत नाही. पीकविमा कंपन्यांनी या प्रक्रियेत सुधारणा करायला हवी. विमाधारक प्रत्येक शेतकऱ्यास नुकसान झाले असता भरपाई मिळाली तर हंगाम खरीप असो रब्बी असो की उन्हाळी, प्रत्येक शेतकरी आपल्या पिकाला विमा संरक्षण देतील. यातून वाढत्या नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांची जोखीम कमी होईल, आणि हा त्यांच्यासाठी मोठा दिलासा असणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.