Soybean Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Varieties : सोयाबीन वाणांची गुणवैशिष्ट्ये

डॉ. आदिनाथ ताकटे, डॉ. अनिल राजगुरू

डॉ. आदिनाथ ताकटे, डॉ. अनिल राजगुरू

Characteristics of Soybean Variety : राज्यात सोयाबीन पिकाच्या लागवड क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. कमी कालावधीत, कमी खर्चात आणि पुरेशा पावसावर येणारे पीक म्हणून सोयाबीन ओळखले जाते. राज्यातील कृषी विद्यापीठांनी कमी, मध्यम व उशिरा कालावधीत तयार होणारे, अवर्षणास प्रतिकारक्षम, कीड व रोगास प्रतिकारक, चांगले उत्पादन देणारे वाण विकसित केले आहेत. लागवडीसाठी स्थानिक परिस्थितीनुसार योग्य गुणवैशिष्ट्ये असलेल्या वाणाची निवड केल्यास चांगले उत्पादन मिळते.

कमी कालावधीत परिपक्व होणारे वाण : जेएस ९३०५, एमएयूएस १५८, एमएयूएस ६१२, एमएसीएस १४६०, एनआरसी १५७

मध्यम कालावधीत परिपक्व होणारे वाण : फुले दूर्वा, फुले किमया, एमएयूएस ७२५, एमएयूएस ७१, सुवर्ण सोया, जेएस ३३५.

उशिरा कालावधीत परिपक्व होणारे वाणः फुले संगम, फुले किमया

दुष्काळसदृश परिस्थितीत चांगले उत्पादन देणारे वाण ः एमएयूएस-७१ (समृद्धी), एमएयूएस ६१२, एमएसीएस १४६०, जेएस ९५-६०

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी द्वारे विकसित वाण

फुले संगम (केडीएस ७२६)

प्रसारण वर्ष : २०१६ मध्ये प्रसारित.

दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू राज्यांत लागवडीसाठी शिफारस,

परिपक्वता कालावधी : १००-१०५ दिवस

वैशिष्ट्ये : जाड व चमकदार दाणे, भारी जमीन व व्यवस्थापन चांगले असल्यास उत्पादन चांगले, तांबेरा रोगास प्रतिकारक

हेक्टरी उत्पादन : हेक्टरी २५ ते ३० क्विंटल

फुले किमया (केडीएस ७५३)

प्रसारण वर्ष : २०१७

दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश कर्नाटक, गुजरात, झारखंड, छत्तीसगड, ओडीशा आणि ईशान्येकडील राज्यासाठी शिफारशीत.

परिपक्वता कालावधी : १०० ते १०५ दिवस

वैशिष्ट्ये : जाड व चमकदार दाणे, तांबेरा रोगास प्रतिकारक्षम.

हेक्टरी उत्पादन : २७ ते ३२ क्विंटल

फुले दूर्वा (केडीएस ९९२)

प्रसारण वर्ष : २०२१

दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू राज्यांत लागवडीसाठी शिफारस.

परिपक्वता कालावधी : ९५ ते १०० दिवस

वैशिष्ट्ये : तांबेरा रोग, खोडमाशी किडीस प्रतिकारक्षम

हेक्टरी उत्पादन : २७ ते ३५ क्विंटल

फुले अग्रणी (केडीएस ३४४)

प्रसारण वर्ष : २०१५

दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू राज्यासाठी शिफारशीत.

परिपक्वता कालावधी : १०० ते १०५ दिवस

वैशिष्ट्ये : तांबेरा रोगास प्रतिकारक्षम

हेक्टरी उत्पादन : २५ ते ३० क्विंटल

फुले कल्याणी (डीएस २२८)

प्रसारण वर्ष : २००६

परिपक्वता कालावधी : ९५ ते १०० दिवस

वैशिष्ट्ये : दाण्याचा रंग फिक्कट पिवळा, मध्यम आकाराचे दाणे, तांबेरा रोगास कमी बळी पडणारा

हेक्टरी उत्पादन : २३ ते २५ क्विंटल

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्याद्वारे विकसित वाण

एमएयूएस -७१ (समृद्धी)

प्रसारण वर्ष : २०१०

परिपक्वता कालावधी : ९५ ते १०० दिवस

वैशिष्ट्ये : मध्यम ते भारी जमिनीत लागवडीस योग्य, शेंगा न फुटणारे वाण, अवर्षणास प्रतिकारक्षम.

हेक्टरी उत्पादन : २८ ते ३० क्विंटल

एमएयूएस -१५८

प्रसारण वर्ष : २०१०

परिपक्वता कालावधी : ९३ ते ९८ दिवस

वैशिष्ट्ये : हलक्या व मध्यम जमिनीत लागवडीस योग्य.

हेक्टरी उत्पादन : २६ ते ३१ क्विंटल

एमएयूएस -६१२

प्रसारण वर्ष : २०१६

परिपक्वता कालावधी : ९४ ते ९८ दिवस

वैशिष्ट्ये : उंच वाढणारे, वातावरण बदलामध्ये ताग धरणारे, दुष्काळसदृश स्थितीत व आंतरपीक पद्धतीसाठी अतिशय योग्य वाण.

हेक्टरी उत्पादन : ३० ते ३२ क्विंटल

एमएयूएस १६२

परिपक्वता कालावधी : १००-१०३ दिवस

वैशिष्ट्ये : उभट वाण

हेक्टरी उत्पादन : २८ ते ३० क्विंटल.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्याद्वारे विकसित वाण :

पीकेव्ही अंबा (एएमएस १००-३९)

प्रसारण वर्ष : २०२१

परिपक्वता कालावधी : ९४ ते ९६ दिवस

वैशिष्ट्ये : लवकर परिपक्व होणारे वाण, मध्यम जमिनीत अत्यंत चांगले उत्पादन देणारे वाण. बदलत्या हवामानास अनुकूल वाण, शेंगा फुटण्याचे प्रमाण कमी, मूळकुज/खोडकुज, चक्रीभूंगा, खोडमाशी या किडींना प्रतिकारक.

हेक्टरी उत्पादनः २८ ते ३० क्विंटल.

पीडीकेव्ही (यलो गोल्ड) (एएमएस १००१)

प्रसारण वर्ष : २०१८-१९

परिपक्वता कालावधी : ९५ ते १०० दिवस

वैशिष्ट्ये : मध्यम कालावधीत येणारे, मध्यम ते भारी जमिनीत लागवड केल्यास हमखास चांगले उत्पादन, मूळकुज व विषाणूजन्य रोगास प्रतिकारक्षम, परिपक्वतेनंतर १० दिवसांपर्यंत शेंगा फुटण्यास प्रतिकारक

हेक्टरी उत्पादन : २२ ते २६ क्विंटल

पीडीकेव्ही सुवर्ण सोया

(एएमएस-एमबी ५-१८)

प्रसारण वर्ष : २०१९-२०

परिपक्वता कालावधी : ९८ ते १०२ दिवस

वैशिष्ट्ये : मूळकुज, खोडकुज, पानावरील ठिपके या रोगास प्रतिकारक, चक्रीभुंगा, खोडमाशी किडीस मध्यम प्रतिकारक.

हेक्टरी उत्पादन : २४ ते २८ क्विंटल.

पीडीकेव्ही पूर्वा (एएमएस २०१४-१)

प्रसारण वर्ष : २०२०-२१

पूर्व भारतातील राज्याकरिता प्रसारित, पूर्व विदर्भातील जास्त पर्जन्यमान असलेल्या भागात उपयुक्त.

परिपक्वता कालावधी : १०२ ते १०५ दिवस

वैशिष्ट्ये : पिवळा मोझॅक या रोगास प्रतिकारक, चक्रीभुंगा, खोडमाशी या किडीस मध्यम प्रतिकारक, परिपक्वतेनंतर १० दिवसांपर्यंत शेंगा फुटण्यास प्रतिकारक.

हेक्टरी उत्पादन : २२ ते २६ क्विंटल

डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९

(एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

डॉ. अनिल राजगुरू, ९४२१९५२३२४

(कृषी वनस्पतीशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Green Soybean : हिरव्या सोयाबीनचा आहारात वाढवा वापर

World River Day : चला साजरा करूयात नद्यांचा उत्सव

NAFED Issue : नाफेडचा पर्याय शेतकऱ्यांच्या माथी मारू नका

Infestation Rice & Sugarcane : शेतकरी दुहेरी संकटात, भातावर खोड किड तर उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव

Soybean Cotton Anudan : २६ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीन, कापूस अनुदान जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT