Soybean Variety : ‘दफ्तरी अॅग्रो’चे ‘सोयाबीन ३५४’ वाण बाजारात

Soybean Market : दफ्तरी अॅग्रो प्रा. लि. या कंपनीने ‘सोयाबीन ३५४’ हा वाण रविवारी (ता. १९) आयोजित केलेल्या वितरकांच्या कार्यक्रमामध्ये बाजारात आणला.
Soybean 354 Variety
Soybean 354 VarietyAgrowon
Published on
Updated on

Nanded News : दफ्तरी अॅग्रो प्रा. लि. या कंपनीने ‘सोयाबीन ३५४’ हा वाण रविवारी (ता. १९) आयोजित केलेल्या वितरकांच्या कार्यक्रमामध्ये बाजारात आणला. या वेळी बोलताना कंपनीचे संचालक शैलेंद्र दफ्तरी यांनी वडील फुलचंदजी दफ्तरी आणि बंधू रवींद्र आणि जैनेंद्र यांच्या सोबत आत्तापर्यंतचा कंपनीचा प्रवास आणि विविध पिकांच्या वाणांच्या संशोधनासंबंधी माहिती दिली.

Soybean 354 Variety
Soybean Variety : यंदाच्या खरीप हंगामासाठी सोयाबीनचे दर्जेदार वाण

नुकत्याच विकसित केलेल्या सोयाबीन वाणाविषयी माहिती देताना शैलेंद्र दफ्तरी म्हणाले, की लवकर म्हणजेच ८० ते ८५ दिवसांत तयार होणारे वाण दफ्तरी चेतक, १२० ते १२५ दिवसांत तयार होणारे दफ्तरी ७७७ आणि आता मध्यम कालावधीचे (म्हणजेच ९५ ते १०५ दिवसांत) तयार होणारे ‘दफ्तरी ३५४’ हे वाण शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार पेरतायेतील.

Soybean 354 Variety
Soybean Varieties : मध्य भारतासाठी प्रसारित वैशिष्ट्यपूर्ण सोयाबीन वाण

सोयाबीन ३५४ वाणाची पेरणी करताना दोन ओळींतील अंतर १६ ते १८ इंचांपेक्षा अधिक नसावे. याची पाने गोल असून, ३-४ फळफांद्या असल्याने वेगाने वाढून जमीन झाकली जाते. परिणामी तणांचा प्रादुर्भाव कमी राहतो.

हे वाण विषाणूजन्य रोगांसाठी प्रतिकारक असून, ३ ते ४ दाण्यांच्या भरपूर शेंगा लागतात. शेंगा पक्व होऊन दाणे गळून वाया जात नसल्याने उत्पादनामध्ये वाढ होत असल्याचा दावा त्यांनी केला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नांदेड येथील बालाजी कृषी सेवा केंद्राचे संचालक व ‘माफदा’चे महासचिव विपिनजी कासलीवर हे होते, तर सुनील कऱ्हाळे, यश गुप्ता, सचिन चिंतावार यांच्यासह जिल्ह्यातील दोनशेपेक्षा अधिक वितरक कार्यक्रमाला उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com