MAIDC  Agrowon
ॲग्रो विशेष

MAIDC : ‘कृषिउद्योग’तील बदलली वरिष्ठांची मुख्यालये

Maharashtra Agriculture Industry Development Corporation : महाराष्ट्र कृषिउद्योग विकास महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुख्यालये बदलण्यात आली आहेत.

Team Agrowon

Agriculture Department : पुणे : महाराष्ट्र कृषिउद्योग विकास महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुख्यालये बदलण्यात आली आहेत. महामंडळाचे मुख्यालय मुंबईत व कामकाज मात्र जिल्हास्तरावरुन बघावे लागणार असल्यामुळे हसावे की रडावे, अशी अवस्था सर्व खातेप्रमुखांची झाली आहे.

 उपमहाव्यवस्थापक सुनील पाटील यांना चक्क दोन मुख्यालये देण्यात आली आहेत. “तुम्ही यापुढे एक आठवडा नागपूर येथून तर  तीन आठवडे मुंबईतून काम करावे,”असे आदेश श्री. पाटील यांना देण्यात आल्यामुळे त्यांची तारांबळ झाली आहे.

राज्याच्या पशुखाद्य व कृषी अभियांत्रिकी विभागाचे उपमहाव्यवस्थापक महेंद्र बोरसे यांना मुंबईऐवजी आता छत्रपती संभाजीनगर येथून काम करण्यास सांगण्यात आले आहे. तेथून सर्व विभागीय कार्यालयांमधील पशुखाद्य विक्री, वसुली, बाजारविस्ताराची कामे करावीत, असे आदेश श्री. बोरसे यांना बजावण्यात आले आहेत.

कीटकनाशके विभागाचे उपमहाव्यवस्थापक डी. एस. दुधडे यांचे मुख्यालय अकोल्याला हलविण्यात आले आहे. अकोल्यातून तुम्ही राज्यातील कीटकनाशक विक्री व बाजारविस्ताराची कामे सांभाळावीत, असे त्यांना सांगण्यात आले आहे. ‘कृषिउद्योग’च्या खते विभागाचा महाव्यवस्थापक आता मुंबईऐवजी पुण्यातून काम सांभाळेल. यापदावरील एम. डी. धांडे यांना पुण्याच्या विभागीय कार्यालयात बसून राज्यातील सर्व खत कारखान्यांचे नियोजन, खत विक्री व बाजारपेठ विस्ताराची कामे करण्यास सूचित केले गेले आहे.

प्रशासन विभागाचे व्यवस्थापक एस. बी. सोनावणे यांच्याकडे  ‘कृषिउद्योग’मधील कार्मिक, विधी, आस्थापना, प्रशिक्षण अशी महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच्या कामकाज वाटपात त्यांच्याकडे पुण्याच्या चिंचवड भागातील कृषी अभियांत्रिकी कार्यशाळेची जबाबदारी देण्यात आली. प्रशासकीय व्यवस्था पाहणारा अधिकारी अभियांत्रिकी प्रकल्प कसे सांभाळणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे. परंतु, मुख्यालयांच्या बदली प्रक्रियेत त्यांना पुण्यात येण्याचे बंधन टाकण्यात आलेले नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT