MAIDC : ‘कृषिउद्योग’च्या अंतर्गत कामकाजात मोठे बदल

Agriculture Development : महाराष्ट्र कृषिउद्योग विकास महामंडळातील कामकाजाला गती देण्यासाठी प्रशासनात मोठे बदल करण्यात आले आहेत.
MAIDC
MAIDC Agrowon

Pune News : महाराष्ट्र कृषिउद्योग विकास महामंडळातील कामकाजाला गती देण्यासाठी प्रशासनात मोठे बदल करण्यात आले आहेत. मात्र या बदलामुळे प्रशासन बळकट होण्याऐवजी कमकुवत होईल, अशी भीती क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

१०० कोटी रुपयांपेक्षा जास्त निविष्ठांच्या खरेदीचा प्रयत्न महामंडळात झाला होता. या व्यवहारातील संशयास्पद घडामोडींचा राज्यभर बोभाटा झाला. त्यामुळे राज्य शासनाने महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून आधीच्या सनदी अधिकाऱ्याला हटविले.

त्यानंतर या पदाची सूत्रे डॉ. मंगेश गोंदावले या नव्या सनदी अधिकाऱ्याकडे देण्यात आली आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, डॉ. गोंदवले व महाव्यवस्थापक सुजित पाटील यांनी वर्षानुवर्षे एकाच चाकोरीतून काम करणाऱ्या प्रशासकीय व्यवस्थेची आधीची रचना बदली आहे. त्यासाठी काहींच्या बदल्या तर काही अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली आहे.

मुख्यालयातील व्यवस्थापक डी. एस. दुथडे यांना कीटकनाशके विभागाच्या उपमहाव्यवस्थापकपदी पदोन्नती दिली आहे. उपमहाव्यवस्थापक महेंद्र बोरसे यांच्याकडून खते विभाग काढून घेण्यात आला आहे. त्याऐवजी त्यांना कृषी अभियांत्रिकी व पशुखाद्य विभागाची जबाबदारी दिली आहे. मुख्यालयातील दुसरे व्यवस्थापक एम. डी. धांडे यांना उपमहाव्यवस्थापकपदी पदोन्नती दिली आहे.

MAIDC
MAIDC Update : ‘कृषिउद्योग’ प्रकल्पांचे लेखापरीक्षण होणार

त्यांच्याकडे कीटकनाशके विभाग सोपविण्यात आला आहे. मुख्यालयातील व्यवस्थापक एस. बी. सोनावणे यांनाही उपमहाव्यवस्थापकपदी पदोन्नती मिळाली आहे. त्यांना प्रशासन विभागाचे प्रमुख केले आहे. चिंचवडमधील कृषी अभियांत्रिकी कार्यशाळेचे सहायक व्यवस्थापक एम. एन. हनुमंते यांना उपव्यवस्थापक (पणन) पदावर बढती मिळाली आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयात काम करतील. तसेच जालना जिल्ह्याचाही पदभार सांभाळतील.

क्षेत्रीय अधिकारी नाराज

अचानक झालेल्या बदल्या, पदोन्नत्यांमुळे क्षेत्रीय अधिकारी मात्र नाराज झालेले आहेत. “महामंडळाची आर्थिक स्थिती झपाट्याने घसरते आहे. क्षेत्रीय पातळीवर कामाला मनुष्यबळ नाही. अशावेळी उच्च पदे भरण्यात काहीही अर्थ नाही. विभाग प्रमुखपद बहाल करताना कामे मात्र भलत्याच विभागाची देण्याचा पायंडा पाडण्यात आला आहे. उदाहरणार्थ, बोरसे यांना कृषी अभियांत्रिकी विभाग देताना खतांची वसुली, विपणनाची कामे सोपवली गेली आहेत,” असे सूत्रांचे म्हणणे आहे.

MAIDC
MAIDC : ‘कृषिउद्योग’च्या व्यवस्थापकीय संचालकपदी डॉ. गोंदावले

...अन्यथा मोठी किंमत मोजावी लागेल

महामंडळाच्या कार्मिक, विधी आणि आस्थापना विभागाची कामे आता चक्क कीटकनाशके विभागाचा प्रमुख बघेल. तर प्रशासन विभागाच्या प्रमुखाला कृषी अभियांत्रिकी, अर्थ, लेखा आणि लेखापरीक्षणाचे अधिकार दिले आहेत. “सर्व विभाग प्रमुखांचे पाय एकमेकांत बांधले आहेत. राज्यातील कोणत्याही महामंडळात असे कामकाज केले जात नाही. ही प्रशासकीय रचना फसल्यास महामंडळाला मोठी किंमत मोजावी लागेल,” असा इशारा एका प्रादेशिक व्यवस्थापकाने दिला.

...अशी असेल महामंडळातील नवी रचना

विभाग प्रमुखपद...अधिकाऱ्याचे नाव...नवी जबाबदारी

उपमहाव्यवस्थापक (नोगा)...सुनील पाटील...नोगा, इतर प्रकल्प

उपमहाव्यवस्थापक (कृषी अवजारे, पशुखाद्य)...महेंद्र बोरसे...पशुखाद्य, महाअॅग्रो मार्ट, खते विभागातील वसुली, खतांमधील इतर कंपन्यांच्या उत्पादनांची विक्री, प्रशिक्षण

उपमहाव्यवस्थापक (कीटकनाशके)...डी. एस. दुथडे...कीटकनाशके, कार्मिक, विधी, आस्थापना, भविष्य निर्वाह निधी

उपमहाव्यवस्थापक (कीटकनाशके)...एम. डी. धांडे...खते उत्पादन, पणन, विक्री

उपमहाव्यवस्थापक (प्रशासन)...एस. बी. सोनावणे...गृह व्यवस्था, औद्योगिक संबंध, प्रसिध्दी, अभियांत्रिकी, कंपनी कामकाज, अर्थ व कर, अंतिम लेखा तसेच लेखापरीक्षण

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com