Chandrashekhar Bhadsawale Agrowon
ॲग्रो विशेष

Norman Borlaug Award : चंद्रशेखर भडसावळे यांचा नॉर्मन बोरलॉग पुरस्काराने गौरव

Chandrashekhar Bhadsawale : दिल्ली येथील ट्रस्ट फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सेस यांच्यातर्फे चंद्रशेखर भडसावळे यांना भारतातील पहिल्या ‘डॉ. नॉर्मन ई. बोरलॉग इनोव्हेटिव्ह फार्मर’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.

Team Agrowon

New Delhi News : दिल्ली येथील ट्रस्ट फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सेस यांच्यातर्फे चंद्रशेखर भडसावळे यांना भारतातील पहिल्या ‘डॉ. नॉर्मन ई. बोरलॉग इनोव्हेटिव्ह फार्मर’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.

शाश्वत शेतीच्या दृष्टीने चंद्रशेखर भडसावळे यांनी शून्य नांगरणी आणि मशागतीवर आधारित संवर्धन शेतीसाठी सगुणा रिजनरेटिव्ह तंत्र (एसआरटी) विकसित केले. तसेच पाणी व्यवस्थापनासाठी सगुणा जलसंवर्धन तंत्र आणि वनसंवर्धनासाठी सगुणा वनसंवर्धन तंत्र विकसित केले आहे.

या तंत्रज्ञानाचा राज्य, परराज्यातील शेतकरी अवलंब करीत आहेत. याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. भारतीय कृषी संशोधन संस्थेमध्ये शुक्रवारी (ता.२०) हा पुरस्कार पार पडला.

यावेळी डॉ. सौम्या स्वामिनाथन यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. पुरस्कारामध्ये प्रशस्तिपत्रक, स्मृतिचिन्हासह रुपये एक लाख रकमेचा समावेश आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश प्रभू यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले.

या विशेष कार्यक्रमामध्ये प्रो. कमल बावा (मॅसेच्युसेट्स विद्यापीठ, अमेरिका), डॉ. बी. एम. प्रसन्ना (संचालक, सीजीआएआर), डॉ. सुजय रक्षित (संचालक, भारतीय कृषी संशोधन परिषद), डॉ फिरोज हुसेन (प्रमुख शास्त्रज्ञ, भारतीय कृvषी संशोधन संस्था) यांना विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Growth: महाराष्ट्राच्या शेतीची अतिवृष्टीने वाताहत ; विकास दर ५.७ टक्क्यांनी घसरला

Agrowon Podcast: सोयाबीन आज स्थिर, कापूस भाव कमीच, हरभरा दबावात, वांग्याला उठाव, कारले टिकून

Maize Price: मक्याला एक हजार हमीभाव फरक द्या, अब्दुल सत्तार यांची विधानसभेत मागणी

Weather Update: राज्यात उन्हाचा चटका वाढला; कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज कायम

Nana Patole statement : 'सरकारने 'बनिया' वृत्ती सोडावी'; सोयाबीन, कापूस, पिकविमा आणि पीएम किसानवरून नाना पटोलेंची सरकारवर टिका

SCROLL FOR NEXT