Sugar Factory Award : भाऊसाहेब थोरात कारखान्यास राष्ट्रीय को-जनरेशन पुरस्कार

National Co-generation Award : बाबासाहेब ओहोळ म्हणाले, की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्याने तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करताना शेतकरी ऊस उत्पादक कामगार यांच्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण केली आहे.
Sugar Factory
Sugar Factoryagrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी कृषी व महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील सहकारासाठी दिशादर्शक ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने प्रगती साधली आहे.

कारखान्याला वीज निर्मितीमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय पातळीवरील नॅशनल को जनरेशन २०२४ हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती चेअरमन बाबासाहेब ओहोळ यांनी दिली.

Sugar Factory
Sugarcane Season 2024 : 'कुर्मदास कारखान्याच्या गाळपा हंगामास प्रारंभ

बाबासाहेब ओहोळ म्हणाले, की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्याने तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करताना शेतकरी ऊस उत्पादक कामगार यांच्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण केली आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे आदर्श तत्त्वावर कारखान्याची वाटचाल सुरू असून कारखान्याने कायम उच्चांकी भाव दिला आहे.

कारखान्यावर सभासद ऊस उत्पादक व कार्यक्षेत्राबाहेर ऊस उत्पादक यांचाही मोठा विश्वास असून यावर्षी सुद्धा दहा लाख टनांपेक्षा जास्त गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. ऊस गाळपाबरोबर कारखान्याने वीज निर्मितीमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

Sugar Factory
Sugarcane Season 2024 : गाळप सुरू होऊन पंधरवडा उलटला, पण ऊसदराबाबत कारखानदार गप्पच

या कामगिरीची दखल घेऊन नॅशनल को-जनरेशन फेडरेशनच्या वतीने स्पेशल कॅटेगरीमधून सातत्यपूर्ण कामगिरीचा नॅशनल को जनरेशन पुरस्कार २०२४ या कारखान्यासाठी जाहीर झाला आहे. यापूर्वीही या पुरस्काराने थोरात कारखान्याचा दिल्ली येथे सन्मान झाला आहे.

हा पुरस्कार सांघीक कामाचे यश आहे. यासाठी सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर सर्व विभाग प्रमुख, वीजनिर्मिती विभाग यांचे योगदान राहिले आहे.

कारखान्याला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माधवराव कानवडे, डॉ. जयश्री थोरात, रणजितसिंह देशमुख, इंद्रजीत भाऊ थोरात, दुर्गा तांबे यांनी चेअरमन बाबासाहेब ओहोळ, संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदींनी अभिनंदन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com