Agrowon Suvarna Kharif Awards 2024 : ’मीना दशमुखे, जगन काळे ‘बंपर’ विजेते

Award Ceremony : ‘ॲग्रोवन सुवर्ण खरीप बक्षीस योजना २०२४’ च्या भाग्यवान विजेता सोडत सोमवारी (ता. १८) ला काढण्यात आली.
Agrowon Suvarna Kharif Awards 2024
Agrowon Suvarna Kharif Awards 2024Agrowon
Published on
Updated on

Pune News : ‘सकाळ ॲग्रोवन’च्या वतीने घेण्यात आलेल्या ‘ॲग्रोवन सुवर्ण खरीप बक्षीस योजना २०२४’मध्ये मीना गोपाल दशमुखे (रा. वाडेगाव बाळापूर, जि. अकोला) आणि जगन संतोबा काळे (रा. शिरड, शहापूर, ता. औंढा, जि. हिंगोली) हे बंपर बक्षीस स्प्लेंडर मोटारसायकलचे विजेते ठरले.

‘सकाळ ॲग्रोवन’च्या वतीने २० जून ते २९ सप्टेंबर दरम्यान घेण्यात आलेल्या ‘ॲग्रोवन सुवर्ण खरीप बक्षीस योजना २०२४’ च्या भाग्यवान विजेता सोडत सोमवारी (ता. १८) महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे शिक्षण व संशोधन संचालक डॉ. हरिहर कौसडीकर आणि विक्रमशील आयात निर्यात प्रा. लि. च्या संचालिका धनश्री शुक्ल यांच्या हस्ते काढण्यात आली.

या वेळी ‘ॲग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सहायक सरव्यवस्थापक (वितरण) संभाजी घोरपडे यांनी केले. सहायक व्यवस्थापक (वितरण) महेश बेले यांनी आभार मानले. उपसरव्यवस्थापक बाळासाहेब खवले यांच्यासह ‘सकाळ’ व ‘ॲग्रोवन’च्या विविध विभागांतील प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

Agrowon Suvarna Kharif Awards 2024
Agrowon Podcast : हरभरा दरावर दबाव कायम; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत हरभरा दर

बक्षीस विजेत्यांची नावे उद्यापासून प्रसिद्ध

वाचकांसाठी आयोजित केलेल्या शंभर दिवसांच्या या स्पर्धेत हजारो शेतकऱ्यांनी भाग घेतला. त्यांनी पाठवलेल्या प्रवेशिकांमधून बक्षीस विजेत्यांची ड्रॉ पद्धतीने निवड करण्यात आली. याद्वारे ७० लाख रुपयांची ३,७०० पेक्षा अधिक बक्षिसे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. इतर बक्षीस विजेत्यांची नावे २० नोव्हेंबरपासून ‘ॲग्रोवन’मधून प्रसिद्ध होणार आहेत. विजेत्यांना संपर्क करून बक्षिसे वितरित करण्यात येणार आहेत.

ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. सर्वसामान्य शेतकऱ्यांना ज्ञानदानातून समृद्धीकडे नेण्याचे काम ‘ॲग्रोवन’ करीत असून या माध्यमातून शेती आणि शेतकऱ्यांना प्रतिष्ठा प्राप्त होत आहे. शेतीपासून दुरावलेले आणि नोकरीनिमित्त शहरांमध्ये स्थिरावलेले नोकरदार ‘ॲग्रोवन’च्या प्रयत्नांमुळे पुन्हा शेतीकडे आकर्षित झाले आहेत. शेतकऱ्यांमध्येही आत्मविश्‍वास वाढत आहे, हे ‘ॲग्रोवन’चे यश आहे.
डॉ. हरिहर कौसडीकर, शिक्षण व संशोधन संचालक,महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद
‘ॲग्रोवन’ वृत्तपत्र प्रसिद्ध होण्यापूर्वी शेतकरी हा एकटा होता. मात्र ‘ॲग्रोवन’मधील ज्ञानामुळे आणि यशोगाथांमुळे राज्यभरातला शेतकरी संशोधक, शास्रज्ञांसह एकमेकांशी बोलू लागला. शहरातील बिगरशेतकरी नागरिक देखील ‘ॲग्रोवन’ वाचून कृषी उद्योजकतेकडे आकर्षित होऊ लागला आहे. अनेक बिगरकृषी नागरिक कृषी आयात निर्यातदार झाले आहे. हे ‘ॲग्रोवन’मुळे शक्य झाले आहे.
धनश्री शुक्ल, संचालिका, विक्रमशील आयात निर्यात प्रा. लि.
Agrowon Suvarna Kharif Awards 2024
Agriculture Commodity Market : मका, सोयाबीनची वाढती आवक

पहिले बक्षीस विजेते (६५ हजार रुपयांचे सोने)

१) नयना प्रकाश पवार (बाबानगर, सिद्धार्थ चौक, नाशिक),

२) सुभाष बाळू पाटील (सिद्धतेर्ली, ता. कागल, जि. कोल्हापूर),

३) राम व्यंकोबा कच्छवे (रा. शिवाजीनगर, मानवत, जि. परभणी),

४) प्रिती अश्‍वमेध बाबर (बाबर वस्ती, उपळाई, ता. माढा, जि. सोलापूर).

दुसरे बक्षीस विजेते (टीव्ही)

१) आकाश सुधाकर जमदाडे (रविवार पेठ, वाई, जि. सातारा),

२) विलास नारायण ठोकळ (रा. जेऊर, करमाळा, जि. सोलापूर),

३) प्रिया तुकाराम दडांजे (अलिपूर, ता. हिंगणघाट, जि. वर्धा),

४) सुरेशराव शिरभाते (जरूड, ता. वरूड, जि. अमरावती),

५) मधुकर भिला माळी (अहिरे गल्ली, संगमेश्‍वर, ता. मालेगाव, जि. नाशिक),

६) स्वाती गणेश नांगरे (लाटेवाडी, गावदेवी मंदिर, डोंबिवली (प.),

७) समीक्षा शशिकांत माळी (करंबळी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर),

८) जयश्री सोमनाथ आदे (रा. रामनगर, पिंपळनेर, ता. साक्री, धुळे),

९) शेख अमिन दादाभाई (पिंपळगाव उज्जैनी, ता. जि. अहिल्यानगर),

१०) सुधीर पाटील (यारमाळ, धायरी, पुणे),

११) मोनिका किरण देवरकर (राजगुरुनगर, ता. खेड, जि. पुणे),

१२) शिवदास सोनबा तरटे (शिवणी, ता. किनवट, जि. नांदेड),

१३) महेश बंडू निरपळ (निरपळ वस्ती, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com