Chandrashekhar Bhadasavale Agrowon
ॲग्रो विशेष

G.W. Bird Family Foundation Award : चंद्रशेखर भडसावळे यांचा जी.डब्ल्यू. बर्ड फॅमिली फाउंडेशन पुरस्काराने गौरव

Saguna Rural Foundation : सगुणा रूरल फाऊंडेशनचे संस्थापक आणि कृषिरत्न पुरस्कार विजेते शेतकरी चंद्रशेखर भडसावळे यांना नुकताच अमेरिकेतील जी.डब्ल्यू. बर्ड फॅमिली फाउंडेशनतर्फे ‘पर्यावरणपूरक शेती हिरो पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

Team Agrowon

Pune News : सगुणा रूरल फाऊंडेशनचे संस्थापक आणि कृषिरत्न पुरस्कार विजेते शेतकरी चंद्रशेखर भडसावळे यांना नुकताच अमेरिकेतील जी.डब्ल्यू. बर्ड फॅमिली फाउंडेशनतर्फे ‘पर्यावरणपूरक शेती हिरो पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

भात शेतीमधील शाश्‍वतता आणि सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक (एसआरटी) या शून्य मशागत शेती पद्धतीमधील भडसावळे यांचे कार्य लक्षात घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली.

एसआरटी तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. हे तंत्रज्ञान पर्यावरणस्नेही व उत्पादनक्षम शेतीसाठी फायदेशीर ठरले आहे. अमेरिकेतील मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी येथे २१ नोव्हेंबर रोजी आयोजित पर्यावरणपूरक शेतीदिन सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार भडसावळे यांना प्रदान करण्यात आला.

या वेळी मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीमधील प्रा. करीम मरेदिया यांच्यासमवेत ‘पर्यावरणपूरक भात उत्पादन तंत्रज्ञान’ या विषयावरील चर्चासत्रामध्ये चंद्रशेखर भडसावळे सहभागी झाले होते. या चर्चेत कमी संसाधने वापरून पीक उत्पादनक्षमता वाढवणे, पर्यावरण संवर्धन आणि पुनरुत्पादनक्षम शेती तंत्रांची महत्त्वाची भूमिका याबाबत भडसावळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Germination Complaints: सोयाबीन उगवण तक्रारी आठ हजारांवर

Youth Protest: तरुणांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा; सरकार चर्चेसाठी तयार, ‘सीजेपी’च्या अटी कायम

Rahul Gandhi: विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची चौकशी करा : राहुल गांधी

Farm Loan Waiver List: मुहूर्ताची यादी ५३३ शेतकऱ्यांची !

Monsoon Rain Forecast: पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ कायम

SCROLL FOR NEXT