Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Weather Update : सिंधुदुर्ग, रत्नागिरी व सोलापूर जिल्ह्यांत पावसाची शक्यता

आ ठवडाभर महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे थंडीचे प्रमाण कायम राहील. सर्व जिल्ह्यांत हवामान अंशतः ढगाळ राहील. त्यातूनच जेथे तापमान वाढेल तेथे हवेचे दाब कमी होऊन पावसाची शक्यता निर्माण होईल.

Team Agrowon

आठवडाभर महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे थंडीचे प्रमाण कायम राहील. सर्व जिल्ह्यांत हवामान (weather) अंशतः ढगाळ राहील. त्यातूनच जेथे तापमान वाढेल तेथे हवेचे दाब कमी होऊन पावसाची शक्यता निर्माण होईल. कोल्हापूर, सांगली, पुणे व सोलापूर जिल्ह्यांत किमान तापमानात वाढ होईल.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यांतही किमान तापमानात वाढ होईल. सुरुवातीस किमान तापमानात घट व नंतर वाढ असे हवामान आंबा पिकास मोहर येण्यास हवामान अनुकूल बनेल. बहुतांशी जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. मात्र उत्तर महाराष्ट्रात वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. बंगालच्या उपसागरात शुक्रवार (ता.१८) रोजी हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. चक्राकार वारे वाहून चक्रीय वादळास स्थिती अनुकूल बनेल. वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहील.

बहुतांश जिल्ह्यात कमाल तापमान ३२ ते ३४ अंश सेल्सिअसच्या जवळपास राहण्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढेल. त्यामुळे पिकांची पाण्याची गरज वाढेल. सकाळ व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होईल. हवामान कोरडे राहील. तापमानात घसरण व पुन्हा वाढ होण्यामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. सध्याचे हवामान रब्बी पिकांसाठी पोषक असेल. गहू, हरभरा, मोहरी, सूर्यफूल व भुईमूग या पिकांची उगवण चांगली होईल.

कोकण

कमाल तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर रायगड जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील.

आकाश अंशतः ढगाळ राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६४ टक्के, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ५५ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३१ ते ३५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १२ किमी राहील. ठाणे व पालघर जिल्ह्यात वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. उद्या (ता.१४) सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ मि.मी., तर रत्नागिरी जिल्ह्यात ४ मि.मी. पावसाची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्र

कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत १८ अंश आणि जळगाव जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ५४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ ते २९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ किमी आणि दिशा आग्नेयेकडून राहील.

मराठवाडा

कमाल तापमान औरंगाबाद जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, तर उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान उस्मानाबाद जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस, तर नांदेड जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील.

लातूर, परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५६ ते ६१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २८ ते ३३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ११ किमी आणि दिशा प्रामुख्याने ईशान्येकडून राहील. शुक्रवारी (ता. १८) बंगालच्या उपसागरात चक्रीय वादळाची निर्मिती झाल्यास नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता निर्माण होईल.

पश्‍चिम विदर्भ

कमाल तापमान अमरावती जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, तर वाशीम, अकोला व बुलडाणा जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान वाशीम जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस, तर अमरावती, अकोला व बुलडाणा जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ५६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २८ ते ३० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ किमी आणि दिशा ईशान्येकडून राहील.

मध्य विदर्भ

कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान यवतमाळ जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ५७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३१ ते ३२ टक्के राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.\

पूर्व विदर्भ

गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस, भंडारा जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गडचिरोली जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल, त्यामुळे थंडीची तीव्रता कमी जाणवेल. चंद्रपूर जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस, गोंदिया व भंडारा जिल्ह्यांत १८ ते १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ५८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २६ ते ३१ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ किमी आणि दिशा ईशान्येकडून राहील. बंगालच्या उपसागरात चक्रीय वादळाची निर्मिती झाल्यास पावसाची शक्यता निर्माण होईल.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र

कमाल तापमान कोल्हापूर जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत २१ ते २२ अंश सेल्सिअस, सोलापूर व पुणे जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस राहील. सातारा जिल्ह्यात ते १९ अंश सेल्सिअस, तर नगर जिल्ह्यात ते १५ अंश सेल्सिअस राहील.

आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत ६२ ते ६६ टक्के, तर सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ५६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ ते ३३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १० किमी आणि दिशा ईशान्येकडून राहील. सांगली जिल्ह्यात पावसाची शक्यता. (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

कृषी सल्ला

बागायती गहू आणि रब्बी ज्वारीची पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी.

रब्बी कांदा लागवड १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी.

पूर्वहंगामी ऊस लागवड १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी.

डाळिंब बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

जनावरांचे थंड वाऱ्यांपासून संरक्षण करण्यासाठी गोठ्याभोवती बारदान किंवा पडदे लावावेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jal Shakti Hackathon 2025: जल व्यवस्थापनासाठी ‘जलशक्ती हॅकेथॉन-२०२५’

NAFED Procurement Center: ‘नाफेड’च्या सोयाबीन खरेदी केंद्रांवर शुकशुकाट

Soybean Future Ban: शेतीमालावरील वायदेबंदी उठविण्याच्या हालचाली

Agriculture Electricity: शेतकऱ्यांना विजेपासून वंचित ठेवणे वैयक्तिक स्वातंत्र्याचा भंग

Sugar Production: साखर उत्पादनात महाराष्ट्रच अव्वल

SCROLL FOR NEXT