Maharashtra Rain Update: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज
Rain Forecast: महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून मॉन्सूनने माघार घेतली आहे. राज्यात उन्हाचा चटका कायम असताना पावसासाठी पोषक हवामान झालं आहे. आज राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.