ZP Panchayat Samiti Election: जिल्हा परिषदेत पाच आणि पंचायत समितीमध्ये दोन स्वीकृत सदस्यांची नेमणूक करण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्याबाबत सरकारकडून हालचाली सुरु आहेत. यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. कार्यकर्ते बंडखोरी करु नयेत म्हणून त्यांना स्वीकृत सदस्यत्वाचे गाजर दाखवले असल्याचा टोला रोहित पवार यांनी महायुती सरकारला लगावला आहे..''निवडणुकीत जास्त यश मिळणार नाही याचा अंदाज आल्यानेच तसेच महायुतीत सुरु असलेल्या शीतयुद्धामुळे पक्षाचे कार्यकर्ते नाराज होऊन बंडखोरी करू नयेत म्हणून स्वीकृत सदस्यत्वाचे गाजर दाखवता यावे यासाठी जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्य घेण्याचा निर्णय सरकार घेत असावे.'' असे त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे..लोकशाहीला तडे देण्याचा प्रयत्न करतच आहात तर मग स्वीकृत सदस्य नेमणुकीवरून तिन्ही पक्षातच हाणामाऱ्या होऊन महायुतीला तडे जाऊ नयेत म्हणजे झालं, असा टोलाही त्यांनी लगावला आहे..ZP Panchayat Samiti Election : कार्यकर्त्यांना संधी मिळणार! जिल्हा परिषदेत ५ आणि पंचायत समितीमध्ये २ स्वीकृत सदस्य नेमणार?.महानगरपालिका आणि नगरपालिकांप्रमाणे आता जिल्हा परिषदेत पाच आणि पंचायत समितीमध्ये दोन सदस्यांची स्वीकृत सदस्य म्हणून नेमणूक करण्याची सरकारने तयारी दर्शवली आहे. यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करण्याची विनंती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. दरम्यान, फडणवीस यांनी या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यांनी याबाबत ग्रामविकास विभागाला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. .Kolhapur ZP Ward Reservation: कोल्हापूर जिल्हा परिषदेचे तालुकानिहाय गट आरक्षण जाहीर, वाचा संपूर्ण यादी.यामुळे ग्रामीण भागात सक्रिय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये प्रतिनधीत्व करण्याची संधी मिळेल. त्यासाठी यासंदर्भातील अधिनियमात सुधारणा करण्याची गरज असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.