Chana Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Market : खानदेशात हरभरादर स्थिर

Chana Rate : खानदेशात हरभरा आवकेत या पंधरवड्यात घट झाली आहे. हरभरा दरात मात्र कुठलीही मोठी सुधारणा दिसत नसल्याची स्थिती आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात हरभरा आवकेत या पंधरवड्यात घट झाली आहे. हरभरा दरात मात्र कुठलीही मोठी सुधारणा दिसत नसल्याची स्थिती आहे. लहान व मोठा काबुली (मेक्सिको) हरभरा दरही स्थिर आहेत. मोठ्या काबुलीला सरासरी १०२०० रुपये प्रतिक्विंटल दर आहेत.

खानदेशात मोठ्या व लहान काबुलीसह देशी हरभऱ्याची आवक कमी झाली आहे. मोठ्या काबुलीसाठी खानदेशात धुळ्यातील शिरपूर, जळगावातील चोपडा येथील बाजार प्रसिद्ध आहेत. तर देशी व लहान काबुलीची आवक धुळ्यातील शिरपूर, जळगावातील चोपडा, अमळनेर, जळगाव, यावल, रावेर येथील बाजारांत अधिक होत असते.

हरभऱ्याची रब्बीत सर्वाधिक पेरणी खानदेशात केली जाते. यंदाही हरभरा पेरणी स्थिर होती. परंतु कापणी, काढणीला मार्चमध्ये पावसाने धुमाकूळ केला. यात हरभरा पिकाची हानी अनेक भागांत झाली. तसेच आवकही काहीशी लांबली. मार्चच्या अखेरीस आवक बऱ्यापैकी होती. ही आवक या महिन्याच्या २० ते २१ तारखेपर्यंत कायम राहिली. परंतु मागील चार ते पाच दिवसांत आवकेत घट झाली आहे.

खानदेशात सध्या विविध प्रमुख बाजारांत हरभऱ्याची प्रतिदिन अडीच हजार क्विंटल आवक होत आहे. त्यात मोठ्या कालुबीची आवक अल्प किंवा रोज २०० ते २२० क्विंटल एवढीच आहे. तर लहान काबुलीची आवक प्रतिदिन ७०० ते ७५० क्विंटल होत आहे.

देशी हरभऱ्याची आवक रोज १४०० ते १५०० क्विंटल एवढी आहे. मोठ्या काबुलीची दरपातळी खानदेशात किमान ९५०० ते १०५०० व सरासरी १०२०० रुपये प्रतिक्विंटल आहे. लहान काबुलीस किमान ७२००, कमाल ८३०० व सरासरी ८००० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. तर देशी प्रकारच्या हरभऱ्यास ५४०० ते ५८९० व सरासरी ५५५० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे.

हरभऱ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या चोपडा येथील बाजारात बुधवारी (ता. २४) फक्त ४०० क्विंटल आवक झाली. त्यात मोठ्या काबुलीची फक्त १०० क्विंटल आवक झाली. पुढे हरभरा आवक आणखी कमी होईल. परंतु दरात मात्र मोठी सुधारणा झालेली नाही, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

SCROLL FOR NEXT