Chana Market : परभणीत हरभऱ्याला मिळतोय सरासरी ५४२५ रुपयांचा दर

Chana Rate : परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी (ता. ५) हरभऱ्याची सुमारे २०० क्विंटल आवक होती.
Chana Market
Chana MarketAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी (ता. ५) हरभऱ्याची सुमारे २०० क्विंटल आवक होती. हरभऱ्याला प्रतिक्विंटल किमान ५३५० ते कमाल ५५०० रुपये तर सरासरी ५४२५ रुपये दर मिळाले.

परभणी बाजार समितीत नवीन हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे. शुक्रवार (ता. २९) ते शुक्रवार (ता. ५) या कालावधीत हरभऱ्याची प्रतिदिन १३५ ते २०० क्विंटल आवकेनुसार एकूण १३३० क्विंटल आवक झाली.

त्यावेळी हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी ५२५० ते ५४५० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता.४) हरभऱ्याची १४५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५२०० ते कमाल ५५०० रुपये तर सरासरी ५४०० रुपये दर मिळाले.

Chana Market
Chana Market Rate : हरभऱ्याच्या भावात तीन कारणांमुळे नरमाई; फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये दरात घसरण

बुधवारी (ता. ३) हरभऱ्याची १३५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५२०० ते कमाल ५५०० रुपये तर सरासरी ५३५० रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. २) हरभऱ्याची १८० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५२०० ते कमाल ५५०० रुपये तर सरासरी ५२५० रुपये दर मिळाले.

Chana Market
Chana Market : हरभरा बाजाराची दिशा काय राहू शकते?

सोमवारी (ता. १) हरभऱ्याची १५८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५२०० ते कमाल ५५०० रुपये तर सरासरी ५४५० रुपये दर मिळाले. रविवारी (ता. ३१) हरभऱ्याची १७७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५२०० ते कमाल ५४२५ रुपये तर सरासरी ५३५० रुपये दर मिळाले.

शनिवारी (ता. ३०) हरभऱ्याची १५७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५२०० ते कमाल ५४०० रुपये तर सरासरी ५३५० रुपये दर मिळाले.शुक्रवारी (ता. २९) हरभऱ्याची १७८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५२०० ते कमाल ५४१० रुपये तर सरासरी ५३५० रुपये दर मिळाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com