Chana Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Harvesting : खानदेशात हरभरा कापणीस वेग

Chana Farming : खानदेशात आगाप पेरणीचा हरभरा कापणीस वेग आला आहे. सध्या दरही सहा हजार रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक असल्याने त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात आगाप पेरणीचा हरभरा कापणीस वेग आला आहे. सध्या दरही सहा हजार रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक असल्याने त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. रब्बीत सर्वाधिक दोन लाख ३० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात खानदेशात हरभऱ्याची पेरणी झाली होती.

एकट्या जळगाव जिल्ह्यात सुमारे एक लाख ६० हजार हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी रब्बीत झाली आहे. तसेच धुळे व नंदुरबारातही हरभऱ्याची पेरणी अधिक झाली होती. कोरडवाहू क्षेत्रात जळगाव जिल्ह्यात चोपडा, जळगाव, अमळनेर, यावल, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा तालुक्यात अनेकांनी दिवाळीच्या काळातच पेरणी केली होती.

कमी पाऊसमान असल्याने हलक्या जमिनीत हरभऱ्याची पेरणी वेळेत होवू शकली नव्हती. परंतु काळ्या कसदार जमिनीत आगाप किंवा दिवाळीनंतर लागलीच पेरणी झाली होती. या काळात पेरणीचे पीक मळणीवर आले आहे. अनेक शेतकऱ्यांनी पिकास एक वेळेस पाणी दिले आहे. तर काहींनी दोन वेळेस पाणी दिले.

या पिकात मागील महिन्यातच दाणे पक्व झाले. ते या महिन्यात मळणीवर आले. त्याची कापणी व मळणीचे काम सध्या खानदेशात सुरू आहे. चोपडा, जळगाव, यावल, शिरपूर भागात अनेक शेतकऱ्यांच्या हरभरा पिकाची कापणी व मळणीचे काम पूर्ण झाले आहे. चोपडा, जळगाव, धुळ्यातील शिरपूर या बाजार समित्यांत हरभऱ्याची विक्रीही शेतकऱ्यांनी केली असून, सुरवातीला पाच हजार २०० ते पाच हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. त्यात चांगली सुधारणा काही दिवसात झाली असून, सध्या सहा हजार १०० ते सहा हजार ४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे.

या दरांचा लाभ या आगाप पेरणीच्या व मळणी झालेल्या हरभऱ्यासंबंधी शेतकऱ्यांना होत आहे. कापणी, मळणीसाठी एकरी चार हजार रुपयांपर्यंतचा खर्च सध्या येत आहे. मजूरटंचाई आहे. उष्णताही मागील आठवड्यात वाढण्यास सुरवात झाली आहे. सध्या कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सीअसपर्यंत जात आहे. सकाळी ११ नंतर ऊन तापू लागते. दुपारी चार ते सव्वाचारपर्यंत उष्णता असते.

रात्री गारवा असतो. परंतु उष्णता वाढल्याने पीक मळणीस अनुकूल स्थिती तयार झाली आहे. अधिकची उष्णता नसल्याने शेतातील कामे दिवसभर शेतकरी उरकत आहेत. पुढे मळणीच्या कामास आणखी गती येईल. कारण हरभरा पक्व होण्याची क्रिया वेगात सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : सोयाबीन खरेदी १२ टक्के ओलाव्याच्या अटीनेच सुरू

Natural Farming : नैसर्गिक शेती राष्ट्रीय अभियानास मंजुरी

Sugarcane Crushing : सोलापुरातील ९ कारखान्यांत ३ लाख ४४ हजार टन गाळप

Sugarcane Harvesting Workers : ऊसतोडणी मजूर कारखान्यावर आल्याने परिसर गजबजला

Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी वाढली

SCROLL FOR NEXT