Chana Arrival : खानदेशात देशी हरभऱ्याची आवक वाढू लागली

Chana Production : खानदेशात देशी प्रकारातील हरभऱ्याची विविध बाजार समित्यांत आवक सुरू झाली आहे. दर किमान ५७७१ व कमाल ६१५१ रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक आहेत.
Chana Market
Chana MarketAgrowon

Jalgaon News : खानदेशात देशी प्रकारातील हरभऱ्याची विविध बाजार समित्यांत आवक सुरू झाली आहे. दर किमान ५७७१ व कमाल ६१५१ रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक आहेत. प्रमुख बाजार समित्यांत हरभऱ्यास मागील पाच - सहा दिवसांपासून सरासरी दर ५८०० रुपये प्रतिक्विंटल असा मिळत आहे.

खानदेशात हरभऱ्यासाठी जळगाव जिल्ह्यातील जळगाव, चोपडा, अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा, धुळ्यातील दोंडाईचा (ता. शिंदखेडा), शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा, नंदुरबार या बाजार समित्या प्रसिद्ध आहेत. यातील चोपडा, जळगाव येथील बाजार समित्यांत मागील आठवड्यातच हरभऱ्याची आवक सुरू झाली.

Chana Market
Chana Arrival : खानदेशात हरभऱ्याची आवक सुरू

चोपडा येथील बाजार समितीत मागील तीन-चार दिवसांत हरभऱ्याची सरासरी २०० क्विंटल आवक झाली आहे. मंगळवारी (ता. ६) तेथे ४०० क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. त्यास ५७७१ व कमाल ६१५१ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. सरासरी दर सर्वत्र ५८०० रुपये प्रतिक्विंटल आहे. हे दर मागील हंगामाच्या तुलनेत अधिक आहेत, अशी माहिती मिळाली.

हरभऱ्याची आवक मागील दोन दिवसांत सर्वत्र वाढली आहे. जळगाव येथील बाजार समितीतही आवक ३०० क्विंटलवर पोचली आहे. आवक पुढील आठवड्यात आणखी वाढेल, असे संकेत मिळाले.

Chana Market
Chana Sowing : हरभऱ्याच्या पेरणी क्षेत्राने पार केला सरासरी क्षेत्राचा टप्पा


हरभऱ्याची पेरणी यंदा अपेक्षेपेक्षा काहीशी कमी झाली होती. तसेच प्रतिकूल स्थितीचा फटकाही पिकास अनेक भागांत बसला आहे. खानदेशात हरभऱ्याची एकूण पेरणी अडीच लाख हेक्टरवर अपेक्षित होती. परंतु पेरणी सुमारे दोन लाख २० हजार हेक्टरवर झाली. जळगाव जिल्ह्यातील पेरणी एक लाख ६५ हजार हेक्टरपेक्षा अधिक होती.

मागील हंगामात जिल्ह्यात हरभऱ्याची पेरणी पावणेदोन लाख हेक्टरपेक्षा अधिक झाली होती. यंदा कमी पावसामुळे कोरडवाहू व अन्य क्षेत्रातील हरभरा पेरणी घटली. यामुळे उत्पादन कमी येईल, असे सुरुवातीपासून सांगितले जात होते. वेळेत किंवा आगाप पेरणी केलेल्या हरभरा पिकात मळणी मागील महिन्यातच सुरू झाली. या हरभऱ्याची आवक बाजारात सुरू आहे.

काबुलीची आवकही वाढली
लहान काबुली प्रकारच्या हरभऱ्याची आवकही खानदेशात वाढली आहे. एकट्या चोपडा बाजार समितीत ४५० क्विंटल एवढी आवक होत आहे. त्याचे दर ९२०० ते १० हजार २०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. त्यास उठाव असल्याने दर टिकून आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com