Radhakrishna Vikhe Patil  Agrowon
ॲग्रो विशेष

Modern Technology : ऊस उत्पादनात आधुनिक तंत्रज्ञान आणण्याचे आव्हान

Farming Techniques : साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आणण्याचे आव्हान आहे, त्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी संशोधन आणि तंत्रज्ञान विकास करण्यासाठी काम करावे, असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

Team Agrowon

Pune News : साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आणण्याचे आव्हान आहे, त्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी संशोधन आणि तंत्रज्ञान विकास करण्यासाठी काम करावे, असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्‍स असोसिएशनच्या (डीएसटीए) ६९ व्या वार्षिक अधिवेशन आणि प्रदर्शनाच्या उद्‍घाटन प्रसंगी दूरदृश्‍य प्रणालीद्वारे मंत्री विखे पाटील बोलत होते. या वेळी आमदार अरुण लाड, साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे (एनएफसीएफएस) अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, एनएफसीएफएसचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, डीएसटीएचे अध्यक्ष एस. बी. भड, उपाध्यक्ष (तांत्रिक) एस. डी. बोखारे आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, ‘‘ऊस उत्पादनखर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे, शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढवून उत्पादनात वाढ करणे आदी नवीन आव्हाने आहेत. आज केवळ साखर उत्पादनावर अवलंबून राहण्यासारखी परिस्थिती नाही. ज्यूस, सिरप, मळीपासून इथेनॉल निर्मितीच्या उत्पादनाचे क्षेत्र पुढे आले आहे, त्याचा साखर कारखान्यांनी फायदा घेतला पाहिजे. केंद्र शासनाच्या धोरणांतर्गत पेट्रोलमध्ये २५ टक्के इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे ऊसशेती, साखर उत्पादन, तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून देशातील नवीन सहकारी साखर कारखाने, खासगी कारखाने यांच्यापुढील आव्हानांवर मार्ग शोधला जात आहे.’’

साखर आयुक्त डॉ. खेमनार म्हणाले, ‘‘साखर कारखान्यांचे भविष्यातील मार्गक्रमण कसे राहील यादृष्टीने साखर आयुक्तालयाचे कार्य सुरू आहे. कारखान्यांमध्ये सीबीजी निर्मितीला केंद्र शासन प्रोत्साहन देत आहे, महाराष्ट्र शासनाचेही त्याबाबत धोरण तयार होत आहे. कारखान्यांना कमीत कमी भांडवल गुंतवणूक करुन वर्षभर आणि हंगामाव्यतिरिक्त उत्पन्न कसे मिळेल यासाठी आयुक्तालयाचा प्रयत्न आहे.’’ साखर आयुक्तालयाच्या वतीने भविष्यात हाती घेण्यात येणाऱ्या उपक्रमासाठी साखर उद्योगाने आपल्या सूचना कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘‘देशातील साखर कारखाने आधुनिक करून त्यांना दिशा देण्याच्या कामात ‘डीएसटीए’ने सिंहाचा वाटा उचलला आहे. केंद्राच्या सहकार मंत्रालयामुळे सहकारी साखर कारखानदारीचे प्रश्‍न सुटण्यास मदत होईल. देशातील अनेक संस्था साखर कारखानदारी आणि या क्षेत्राशी निगडित असून, त्यांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी एनएफसीएफएस काम करेल.’’

डीएसटीएचे अध्यक्ष श्री. भड यांनी प्रास्ताविक केले. ‘डीएसटीए’च्या वार्षिक अहवाल पुस्तिकेचे या वेळी प्रकाशन करण्यात आले. या वेळी विवेक हेब्बल, दिलीपराव देशमुख, आमदार श्री. लाड, प्रकाश नाईकनवरे, अमृतलाल पटेल, संजय अवस्थी यांना साखर उद्योग गौरव पुरस्कार देण्यात आला. विविध पुरस्कारांचे वितरण या वेळी करण्यात आले. कार्यक्रमास साखर कारखाने व ऊस उत्पादन क्षेत्राशी तंत्रज्ञ, संशोधक आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Center Strike: ‘साथी पोर्टल’ विरोधात सोमवारी विदर्भात कृषी केंद्रधारकांचा बंद

Vidhan Parishad Opposition Leader : सतेज पाटील विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते?

Heavy Rain Issue: उत्तरेकडील पावसाने केळी बाजाराला फटका

Fish Price: मासळीच्या दरात सुधारणा

Onion Procurement Irregularities: कांदा खरेदीतील ‘सप्लाय व्हॅलिड’ एजन्सी संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT