Cercospora Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Moong Crop Disease : मूग पिकातील ‘पानावरील सरकोस्पोरा ठिपका’

Team Agrowon

राहुल वडघुले

मराठवाडा आणि विदर्भात मूग पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात घेतले जाते. याशिवाय सातारा, सांगली, नगर, नाशिक आदी भागांत ही लागवड होते. या पिकामध्ये भुरी, ॲन्थ्रॅकनोज, पानावरील सरकोस्पोरा ठिपका आणि पिवळा मोझॅक या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. आजच्या लेखात ‘पानावरील सरकोस्पोरा ठिपका’ या रोगाविषयी माहिती घेऊ.

लक्षणे

या रोगाची लक्षणे पाने, फांदी, व शेंगावर दिसून येतात.

सुरुवातीला अनेक लालसर रंगाचे ठिपके दिसतात. ठिपक्यांमध्ये खोलगट भाग दिसून येतात. हे ठिपके मोठे होत जाऊन मध्यभागी पांढरट ठिपका दिसू लागतो. बाजूला लालसर गोलाकार ठिपका तयार होतो. या लालसर ठिपक्याच्या बाजूने पिवळे वलय दिसते.

ठिपके एकमेकांमध्ये मिसळून संपूर्ण पान वाळून गळून जाते.

रोगाची माहिती

रोगाचे नाव : पानावरील सरकोस्पोरा ठिपका

हा रोग बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतो.

बुरशीची डिव्हिजन : Ascomycota

रोग निर्माण करणाऱ्या बुरशीचे शास्त्रीय नाव ः सरकोस्पोरा कॅनेसेनस (Cercospora canescens).

आढळ : सर्व मूग उत्पादक भागामध्ये प्रादुर्भाव आढळून येतो.

नुकसान : या रोगामुळे पिकाचे ६० टक्क्यांपर्यंत नुकसान होण्याची शक्यता असते.

यजमान पिके : तूर, उडीद.

रोग कसा निर्माण होतो

या रोगाची बुरशी मागील वर्षीच्या पानांवर, फांद्यांवर, बियाण्यांवर किंवा शेंगांवर स्ट्रोमा नावाचे एक अवयव बनवून सुप्त अवस्थेत जाते. वातावरणातील आर्द्रता ९० ते १०० टक्के आणि २५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमानात या स्ट्रोमापासून बीजाणूधानी (Conidiophore) तयार होतात.

या बीजाणू धानीमध्ये बुरशीचे बीजाणू (Conidia) तयार होतात. हे बीजाणू प्राथमिक लागण होते. त्यानंतर नवीन पिकावर रोग निर्माण होतो. नवीन रोगांच्या ठिपक्यांमध्ये अनेक बीजाणू तयार होतात. ते बीजाणू पुढील लागण करून रोगाचा प्रसार करतात. याला दुय्यम लागण असे म्हणतात.

सूक्ष्मदर्शकाखाली काय दिसते?

सूक्ष्मदर्शकाखाली आपण रोगाचे बीजाणू अतिशय स्पष्टपणे पाहून रोग निश्‍चिती करू शकतो. हे बीजाणू वक्राकार, लांब असतात. त्यांचा खालचा भाग (Base) मोठा (obconical) व पुढे निमुळता होत गेलेला दिसतो. या बीजाणूमध्ये अनेक सेप्टा दिसून येतात. त्यांचा रंग पारदर्शक ते फिक्कट हिरवा असतो.

नियंत्रणाचे उपाय

बीजप्रक्रिया करावी.

लागवडीसाठी रोग प्रतिकारक्षमता असलेल्या वाणांची निवड करावी.

तूर, उडीद यांसारख्या पिकांची लागवड मूग लागवड क्षेत्राजवळ करून नये.

मूग लागवडीनंतरचे पुढील पीक तूर सारखे नसावे.

शेतात हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.

पिकाची पाने ओली असताना पिकामध्ये कोणतीही काम करू नयेत. रोगग्रस्त पाने काढून टाकावीत.

वेळीच तणनियंत्रण करावे.

जमिनीवर ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी.

नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या बुरशीनाशकांचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT