Kharif Sowing 2025  Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing 2025 : कापूस, तेलबिया, कडधान्य लागवडीखालील क्षेत्र पिछाडीवर; केंद्रीय कृषिमंत्रालयाचा अहवाल

Sowing india | खरीप पेरणीसाठी देशात सरासरी १,०९७ ल.हे. क्षेत्र असून, त्यापैकी सध्या ६५ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. भात, कडधान्ये व तृणधान्यांचे क्षेत्र आघाडी आहे. परंतु तेलबिया आणि कापसाचे क्षेत्र पिछाडीवर असल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे.

Dhananjay Sanap

Kharif Sowing - देशात यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी १८ जुलैपर्यंत सुमारे ७०८.३१ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ४ टक्क्यांनी पेरणी क्षेत्राने आघाडी घेतली आहे. परंतु मागील आठवड्याच्या तुलनेत पेरणीचा वेग काहीसा कमी झाला आहे.

खरीप पेरणीसाठी देशात सरासरी १,०९७ ल.हे. क्षेत्र असून, त्यापैकी सध्या ६५ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. भात, कडधान्ये व तृणधान्यांचे क्षेत्र आघाडी आहे. परंतु तेलबिया आणि कापसाचे क्षेत्र पिछाडीवर असल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे.

पेरणी क्षेत्र

देशात तेलबियांची एकूण पेरणी १५६.७६ लाख हेक्टरवर झाली आहे. तेलबियामध्ये मागील वर्षीपेक्षा थोडी पिछाडी दिसत आहे. सोयाबीनची लागवड १११.६७ लाख हेक्टरवर झाली असून ती ६.१ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. भुईमूगची लागवड थोडीशी वाढली असून ती ३८.०१ लाख हेक्टरवर आहे. कापसाची लागवड ९८.५५ लाख हेक्टरवर झाली आहे. ती मागील वर्षीपेक्षा ३.४ टक्क्यांनी पिछाडीवर आहे.

देशात कडधान्यांमध्ये मुगाची लागवड २७.३१ लाख हेक्टरवर आहे. परंतु तूर आणि उडीदची पेरणी घटली आहे. तुरीची पेरणी ३०.०९ लाख हेक्टरवर (५.१ टक्के घट) आणि उडीद १४.४५ लाख हेक्टरवर (१२.५ टक्के घट) झाली आहे. भरडधान्यांमध्ये चांगली वाढ झाली असून मका, बाजरी आणि ज्वारी यांची लागवड वाढली आहे. मक्याची पेरणी ७१.२१ लाख हेक्टरवर झाली आहे, मागील वर्षीपेक्षा १५ टक्क्यांनी आघाडी पाहायला मिळत आहे.

तसेच भाताची लागवड १७६.६८ लाख हेक्टरवर झाली असून ही मागच्या वर्षीपेक्षा १२.४ टक्क्यांनी आघाडी घेतली आहे. थोडक्यात, भात, मुग, मका आणि भुईमूगसारख्या पिकांमध्ये चांगली आघाडी दिसत आहे. परंतु तेलबिया, कापूस आणि कडधान्यांमध्ये पिछाडी असल्याचे केंद्रीय कृषी विभागाने सांगितले आहे. 

यंदा पावसाने विविध भागात हजेरी लावली आहे. त्यामुळे पेरणीने जुलैच्या पहिल्या आठवड्यापासूनच वेग घेतल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, १ जून ते २१ जुलै दरम्यान देशात पर्जन्यमान सरासरीपेक्षा ७% जास्त म्हणजे ३६६.४ मिमी झाले आहे. मात्र, पूर्व आणि ईशान्य भारतात २२ टक्के पाऊस कमी झाला. दक्षिण भारतात ६ टक्के कमी, तर मध्य व उत्तर भारतात पावसाचा जोर अधिक राहिला असूण २४ ते ३० टक्के अधिक पाऊस झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT