Onion Export India Ban : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर घातलेली बंदी उठविल्याचे सांगितले. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या समितीने निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात सरकारने कांद्याची निर्यात बंदी केलीच नसल्याचे आता वृत्त समोर आले आहे. डिसेंबर २०२३ मध्ये कांद्याचे वाढते भाव लक्षात घेऊन केंद्राने ३१ मार्च २०२४ पर्यंत बंदी घातली होती ती कायम ठेवली आहे.
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आल्याचा संताप शेतकऱ्यांमधून व्यक्त होतेय. कांद्याच्या निर्यातीवरील बंदी ३१ मार्च या अंतिम मुदतीपर्यंत कायम राहील अशी माहिती समोर आली आहे. कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्यात आलेली नाही. ती लागू आहे कोणत्याही स्थितीत बदल झालेला नाही," असे ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी माहिती दिली. याबाबत त्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली.
कांदा ग्राहकांना चढ्या दराने कांदा विकत घेण्याची वेळ येऊ नये यासाठी सरकारकडून यावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. दरम्यान देशातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव कांदा मार्केटमध्ये पुन्हा एकदा कांदा दर घसरल्याचे चित्र आहे. आज (दि.२०) सकाळ सत्रातील लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची सरासरी ८ हजार ५०० क्विंटल आवक झाली. तर सरासरी १६५० इतका भाव मिळाला.
रविवारी निर्यात बंदीची घोषणा झाल्यानंतर कांदा बाजारभावात वाढ होईल अशी शक्यता होता परंतु दरात घसरण दिसून आली. राज्यात सलग सुट्ट्यांमुळे बाजार समित्या बंद होत्या. आज (ता.२०) खुल्या झालेल्या बाजारसमितीमध्ये कमीत कमी ८०० तर सरासरी १६५० रुपये इतका भाव मिळत होता.
येवला -आंदरसूल बाजार समितीमध्ये ५ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. कमीत कमी ३५० रुपये तर सरासरी १ हजार ६७५ रुपये भाव मिळाला. लासलगाव - विंचूर बाजार समितीमध्ये १० हजार ३०० क्विंटल कांद्याची आवक झाली. कमीत कमी ९०० रुपये तर सरासरी १ हजार ६५० रुपये भाव मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये ८ हजार क्विंटल पोळ कांद्याची आवक झाली. कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १ हजार ७०० रुपये भाव मिळाला.
लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर
दरम्यान आगामी काळात देशात लोकसभेच्या निवडणुका असल्याने सरकार ३१ मार्च नंतरही कांद्यावरील निर्यात बंदी कायम ठेवण्याची शक्यता आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने हिवाळी कांद्याचे उत्पादन महाराष्ट्रात अत्यंत कमी उत्पादनाची नोंद झाली आहे. २०२३ च्या रब्बी हंगामात कांद्याचे उत्पादन २२.७ दशलक्ष टन होण्याचा अंदाज होता. परंतु तो अपेक्षेपेक्षाही कमी झाला आहे.
कृषी मंत्रालयाचे अधिकारी येत्या काही दिवसांत महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये रब्बी कांद्याच्या व्याप्तीचे मूल्यांकन करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.