Sharad Pawar  Agrowon
ॲग्रो विशेष

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार केंद्राला : शरद पवार

Sharad Pawar : ‘‘मराठा समाजाला ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून आरक्षण देण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारला आहे. केंद्र सरकारने मराठा आरक्षण द्यावे, आम्ही सरकारला सर्व सहकार्य करायला तयार आहोत,’’

Team Agrowon

Pune News : ‘‘मराठा समाजाला ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून आरक्षण देण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारला आहे. केंद्र सरकारने मराठा आरक्षण द्यावे, आम्ही सरकारला सर्व सहकार्य करायला तयार आहोत,’’ अशी माहिती राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी (ता.१२) पत्रकार परिषदेमध्ये दिली.

बार्शी येथे रविवारी (ता.११) मराठा आंदोलकांनी शरद पवार यांची गाडी अडवून आरक्षणप्रश्‍नी भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले होते. यानंतर सोमवारी (ता.१२) काही मराठा आंदोलक नेत्यांनी श्री. पवार यांची पुण्यात भेट घेतली. या भेटीनंतर ‘मोदी बाग’ या त्यांच्या निवासस्थानी पत्रकर परिषदेमध्ये शरद पवारांनी आपली भूमिका जाहीर केली.

या वेळी बोलताना शरद पवार म्हणाले, ‘‘५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही, असा न्यायालयाचा निर्णय आहे. मात्र ही मर्यादा ओलांडण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे आहे. यामुळे केंद्र सरकारने मराठा आरक्षण द्यावे, त्यासाठीआम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समजासह धनगर, लिंगायत, मुस्लीम आरक्षण याविषयीही भूमिका मांडली आहे. महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण चांगले ठेवण्याची जबाबदारी सर्वांनी घेतली पाहिजे. दोन समाजांत कटुता निर्माण होणार नाही, यासाठी पावले टाकली पाहिजेत. याबाबत माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे.

मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. त्यांना योग्य वाटतील त्या व्यक्तींना निमंत्रित करावे. आम्हीही उपस्थित राहू. राजकीय पक्षातील नेते, विविध घटक, मनोज जरांगे पाटील यांना निमंत्रित करावे. ओबीसींचे नेतृत्व करणाऱ्या छगन भुजबळ आणि अन्य नेत्यांनाही संयुक्त बैठकीस बोलवावे,’’ असे पवार या वेळी बोलताना म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Market Committee Privatization: बाजार समित्या अदानी-अंबानींच्या घशात घालण्याचा डाव; नहाटा यांचा गंभीर आरोप

Sugarcane Crop Management: गारपीटग्रस्त स्थितीतील ऊस पिकाचे व्यवस्थापन

Low Cost Feed Management: कमी खर्चात जनावरांचे खाद्य आणि चारा व्यवस्थापन

Quality Seeds Selection: वाण निवडीत दाखवा खरे शहाणपण

External Parasites Control: जनावरातील बाह्य परजीवींचे नियंत्रण

SCROLL FOR NEXT