Shahi Dasara sohala Agrowon
ॲग्रो विशेष

Dasara Celebreation : विजयादशमीचा सोहळा दिमाखात साजरा

Kolhapur Shahi Dasara : कोल्हापूरात विजयादशमीचा सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात मावळतीच्या सुवर्णकिरणांच्या साक्षीने दिमाखात साजरा झाला

Team Agrowon

Kolapur News : कोल्हापूरात विजयादशमीचा सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात मावळतीच्या सुवर्णकिरणांच्या साक्षीने दिमाखात साजरा झाला. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते शमीपूजन झाले. यानंतर छत्रपतींच्या कुटुंबातील युवराज संभाजीराजे छत्रपती, महाराज कुमार मालोजीराजे छत्रपती, यौवराज शहाजीराजे छत्रपती, श्रीमंत यशराजराजे छत्रपती यांनी सोने लुटताच करवीर वासियांनी अपूर्व उत्साहात सीमोल्लंघन करून सोने लुटले.

शाही दसऱ्याला यावर्षी महाराष्ट्र शासनाकडून राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून हा उत्सव जागतिक स्तरापर्यंत नेण्याचा मानस ठेवून १५ ते २४ ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव यावर्षी भव्य स्वरूपात अभूतपूर्व उत्साहात झाला.

सोहळ्यास पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पद्मश्री प्रतापसिंह जाधव, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, खासदार धनंजय महाडीक, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील -भुजबळ, जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, आदी उपस्थित होते.

साताऱ्यात भवानी तलवारीचे पूजन

विजयादशमी निमित्त मंगळवारी (ता. २४) जलमंदिर पॅलेसमध्ये श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते भवानी तलवारीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पोवई नाका येथे सीमोल्लंघन झाले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ४७८ केंद्रे

Livestock Census : राज्यात ॲपद्वारे होणाऱ्या पशुगणनेस आजपासून प्रारंभ

Dana Cyclone : ‘डाना’ चक्रीवादळ आज किनाऱ्याला धडकण्याची शक्यता

Fruit Crop Insurance Issue : फळपीक विमा योजनेत बोगस अर्जांचे ‘पीक’

Vidarbha Weather : विदर्भात पावसाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT