Farming Productivity: वाडा तालुक्यातील अबिटघर ग्रामपंचायतीच्या सरपंच साक्षी साठे यांच्या प्रयत्नांतून तसेच एक्रिसाट (आयसीआरआयएसएटी) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून साठेपाडा व परिसरात युद्धपातळीवर सुरू असलेल्या जलसंधारण व शेती सुधारणा कामांची खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी प्रत्यक्ष पाहणी केली..या वेळी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन त्यांनी एक्रिसाटच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक हवामान केंद्र तसेच विहिरीतील पाण्याची पातळी तपासण्यासाठी होत असलेल्या प्रयोगाचे तसेच या अभिनव प्रकल्पाचे कौतुक केले. .Water Conservation: पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवा : प्राचार्य तेजनकर.हैदराबादस्थित आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन संस्था एक्रिसाट ग्लोबल रिसर्च प्रोग्राम सेंटरचे संचालक डॉ. रमेश सिंह यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प राबविण्यात येत असून, मुख्य वैज्ञानिक डॉ. कौशल गर्ग, प्रकल्प प्रमुख डॉ. वेंकट राधा, नागराजू या ख्यातनाम संशोधकांचे मार्गदर्शन लाभत आहे. शाश्वत शेती विकासाच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे..Water Conservation: भविष्यातील पिढ्यांसाठी जलसंपत्ती जपणे ही सामूहिक जबाबदारी : जिल्हाधिकारी अशीमा मित्तल .पाणीटंचाईवर मातकामाची प्रगती पाहून खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी सरपंच साठे, एक्रिसाटच्या संशोधकांचे पथक तसेच स्थानिक शेतकऱ्यांचे अभिनंदन करीत हा प्रकल्प ग्रामीण विकास आणि शाश्वत शेतीसाठी आदर्श ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. .त्यांनी अशा लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यास मोठी मदत होणार असल्याचे या वेळी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.