Cashew Orchard Inspection Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Orchard : कीटकशास्त्रज्ञ, कृषी अधिकाऱ्यांकडून सिंधुदुर्गात काजू बागांची पाहणी

Crop Protection : काजू बी आणि बोंड खाणाऱ्या अळीच्या प्रादुर्भाव वाढल्यामुळे गुरुवारी (ता. ६) कीटकशास्त्रज्ञ डॉ. गोपाळ गोळवणकर यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तालुक्यातील पाच गावांतील काजू बागांची पाहणी केली.

Team Agrowon

Sindhudurg News : काजू बी आणि बोंड खाणाऱ्या अळीच्या प्रादुर्भाव वाढल्यामुळे गुरुवारी (ता. ६) कीटकशास्त्रज्ञ डॉ. गोपाळ गोळवणकर यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तालुक्यातील पाच गावांतील काजू बागांची पाहणी केली. बी खाणाऱ्या अळीबरोबर फुलकिडींचा देखील प्रादुर्भाव वाढल्याचे या सर्व्हेक्षणात आढळून आले.

जिल्ह्यात काजू पिकांवर बी आणि बोंड खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. गेल्या वर्षीपासून या अळीचा प्रादुर्भाव जाणवण्यास सुरुवात झाली होती. परंतु यावर्षी मोठ्या प्रमाणात या किडीने काजू पिकाचे नुकसान केले आहे. जिल्ह्याच्या बहुतांश काजू बागांमध्ये ही कीड दिसून येत आहे.

या संदर्भातील अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आल्यानंतर गुरुवारी वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्रांचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. गोपाळ गोळवणकर हे वैभववाडी तालुक्यात आले. त्यांच्यासमवेत तालुका कृषी अधिकारी निरजंन देशमुख, मंडल अधिकारी उत्तम मंदावाड, कृषी पर्यवेक्षक प्रकाश लांबोर, आत्माचे राकेश हुले, कृषी सहायक मीनाक्षी भुजंग आदी होते.

त्यांनी गुरुवारी सकाळी खांबाळे येथील तीन-चार शेतकऱ्यांच्या बागांची पाहणी केली. या बागांमध्ये त्यांना अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसुन आला. या अळीच्या नियत्रंणासाठी विद्यापीठाने शिफारस केलेल्या कीटकनाशकांची फवारणी केली परंतु त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही.

याशिवाय काजूपिकावर फुलकिडींचा प्रादुर्भाव देखील वाढल्याचे दिसून आले. या वेळी श्री. गोळवणकर यांनी या किडीची दखल घेऊन गेल्या वर्षीपासूनच विद्यापीठस्तरावर यासंदर्भात काम सुरू केले आहे. परंतु त्यासंदर्भातील अंतिम निष्कर्ष आल्याशिवाय त्यांची अमंलबजावणी करता येणार नसल्याचे स्पष्ट केले.

या पथकाने खांबाळे, कोकिसरे, उंबर्डे, कुसुर, कुंभवडे या गावातील काजू बागांची पाहणी केली. याशिवाय कृषी सहायकांनी यासंदर्भातील नोंदी ठेवण्याबाबतच्या सूचना देखील श्री. गोळवणकर यांनी केल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Protest: निमखेडी येथे शेतकऱ्यांचे ‘रास्ता रोको’

Jaltara Project: बार्शीत ‘जलतारा प्रकल्प’ प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात

Shaktipeeth Highway Project: अंगावर गोळ्या झेलू, पण ‘शक्तिपीठ’ होऊ देणार नाही

Maize Varieties: एल निनोच्या परिस्थितीशी सामना करु शकणारे मक्याचे वाण

Farmer Issues: सर्वसामान्यांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यात सरकार अपयशी : हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT