Food Technology  Agrowon
ॲग्रो विशेष

Food Technology : अन्नतंत्रज्ञान उद्योगातील करिअर संधी

Food Technology Carreer : अन्न तंत्रज्ञान (फूड टेक्नॉलॉजी) यासारखे अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या उद्योगांमध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. त्याशिवाय स्वत:चा उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठीदेखील हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतो.

Team Agrowon

Career Opportunities In Food Technology : देशातील अन्नतंत्र क्षेत्रातील संधी दिवसेंदिवस वाढत आहेत. लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि पद्धती मागील काही वर्षांत बऱ्याच बदलल्या आहेत. त्यामुळे त्यानुसार अन्नप्रक्रिया (Food Processing) आणि तत्सम उत्पादनांच्या निर्मिती आणि मूल्यवर्धनात बरेच बदल झाले आहेत.
विविध धान्य, फळे व भाजीपाला यावर काढणीपश्‍चात तंत्रज्ञानापासून शास्त्रशुद्ध प्रक्रिया करून मूल्यवर्धित पदार्थांची निर्मिती केली जाते. आणि साठवण कालावधी वाढविला जातो. विविध रेडी-टू-इट आणि फास्ट फूडची मागणी दिवसेंदिवस वाढते आहे.

बेकरी उत्पादने आणि मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे, फळे आणि भाज्यांवर प्रक्रिया करून त्या अधिक काळ टिकविण्याचे आणि खाण्यायोग्य बनवण्याचे काम अन्नतंत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे केले जाते. हे करीत असताना त्या पदार्थांची चव, रंग आणि त्यातील गुणधर्म टिकविण्याचे आव्हानही समोर असते. त्याचसाठी अन्नतंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ काम करित आहेत.

या क्षेत्रात नवनवीन पदार्थांच्या निर्मितीस अधिक वाव आहे. हे क्षेत्र मागील काही वर्षांत बरेच विस्तारले आहे. अन्नपदार्थांची निर्मिती, सुरक्षितता, पॅकेजिंग, संशोधन अशा विविध कामांसाठी कुशल मनुष्यबळाची गरज भासते. येत्या काळात करिअरच्या दृष्टिकोनातून रोजगार निर्मितीच्या भरपूर संधी असलेले क्षेत्र म्हणून अन्नप्रक्रिया उद्योग उदयास येत आहे.
अन्न तंत्रज्ञान (फूड टेक्नॉलॉजी) यासारखे अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या उद्योगांमध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. त्याशिवाय स्वत:चा उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठीदेखील हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतो.

पात्रता ः
- बारावीनंतर बी.टेक. (अन्नतंत्रज्ञान) हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तसेच पारंपरिक विद्यापीठांच्या रसायन तंत्रज्ञान विभागांतर्गत चालविण्यात येतो.


- या शाखेत प्रवेश घेण्यासाठी बारावीमध्ये विज्ञान शाखेतून (गणित, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र किंवा गणित, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र विषयांसह) उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच २०२२ ते २०२३ या वर्षातील PCM या विषयात MHT CET/ JEE परीक्षा दिलेली असावी.

अर्ज करण्याची अंतिम तारीख ः
कृषी विद्यापीठात आणि विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेची अंतिम तारीख १६ जुलै २०२३ आहे. अर्ज करण्यासाठी https://ug.agriadmissions.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करावी.

करिअर संधी ः
- अन्न अभियंता ः खाद्यपदार्थ निर्मिती आणि प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रसामग्री, त्यांची निगा आणि दुरुस्ती, उत्पादन व्यवस्थेतील तांत्रिक नियोजन, सुधारणा प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी अन्न अभियंत्याची गरज असते.
- अन्नघटक विश्‍लेषक ः तयार अन्नपदार्थांतील पोषणमूल्यांचे प्रमाण तपासणे तसेच त्यातील घटकांचा अन्नपदार्थाची चव, रंग इत्यादींवर होणाऱ्या परिणामांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणे.
- उत्पादन अधिकारी ः उपलब्ध मनुष्यबळाचे व कच्या मालाचे सुयोग्य व्यवस्थापन करून प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ निर्माण करणे.
- दर्जा आणि गुणवत्ता अधिकारी ः गुणवत्तापूर्ण आणि पोषक अन्नपदार्थ बनविण्यासाठी निर्मिती प्रक्रियेचे नियंत्रण करणे.
- अन्नतंत्रज्ञ आणि विश्‍लेषक ः खाद्य आणि पेय अन्नपदार्थ घटकांचे रासायनिक विश्‍लेषण करणे. तयार खाद्य व पेय उत्पादनाची गुणवत्ता, चव तपासणे व सुधारणे हे या संशोधकांच्या कामाचे स्वरूप असते.
- अन्न सुरक्षा अधिकारी ः शासनाच्या अन्न आणि औषध विभागांतर्गत बाजारात उपलब्ध असलेल्या अन्नपदार्थांवर गुणवत्ता आणि दर्जात्मक नियंत्रण ठेवण्यासाठी या पदावर पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यात येते.
- अन्नपुरवठा अधिकारी ः शासनाद्वारे या पदासाठी पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यात येते.
- अन्न व्यवसायिक ः विविध अन्न पदार्थांची प्रक्रिया, निर्मिती, उत्पादन, वितरण यामध्ये समावेश तसेच उत्पादक होणे.
- पेटंट अधिकारी ः अन्न तंत्रज्ञान या पदवी अंतर्गत विविध कृती, प्रक्रिया, उपकरणे यासंदर्भात पेटंट दाखल करण्याची कामे या अधिकाऱ्यामार्फत केली जातात.
- उच्च शिक्षणाच्या संधी ः ही पदवी घेतल्यानंतर पात्रतेनुसार या क्षेत्रातील पदव्युत्तर आणि आचार्य पदवी संपादित करून शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याच्या विविध संधी उपलब्ध असतात.

इतर क्षेत्रांतील संधी ः
- या क्षेत्राशी निगडित सरकारी, निमसरकारी कार्यालये, महामंडळे (फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI), भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI), भारतीय मानक प्राधिकरण (BIS), मॉडर्न फूड कॉर्पोरेशन, नॉर्थ इस्टर्न अ‍ॅग्रिकल्चरल मार्केटिंग कॉर्पोरेशन) या संस्थांमध्ये तज्ज्ञ म्हणून रोजगाराच्या संधी आहेत.


- याशिवाय नामांकित खासगी उद्योगामध्ये तसेच स्थानिक पातळीवरील अनेक खासगी उद्योग संस्थांमध्ये चांगल्या रोजगार संधीही उपलब्ध होतात.
----------------
- प्रा. व्ही. आर. चव्हाण, ९४०४३२२६२३
- डॉ. आर. एच. जाजू, ९४२०४२२९८९
(एमजीएम अन्नतंत्र महाविद्यालय, गांधेली, जि. छत्रपती संभाजीनगर)


ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT