Cotton Agrowon
ॲग्रो विशेष

BT Cotton : बीटी वाणांची निवड करताना घ्यावयाची काळजी

BT cotton varieties : राज्यात मोठ्या प्रमाणात कपाशी लागवड ही कोरडवाहू क्षेत्रात केली जाते. योग्य लागवड पद्धतीचा अभाव, किडी व रोगांचा प्रादुर्भाव आणि पावसाचा अनियमितपणा यामुळे उत्पादकता कमी आहे.

Team Agrowon

डॉ. एस. एन. पोतकिले

Cotton Cultivation : राज्यात मोठ्या प्रमाणात कपाशी लागवड ही कोरडवाहू क्षेत्रात केली जाते. योग्य लागवड पद्धतीचा अभाव, किडी व रोगांचा प्रादुर्भाव आणि पावसाचा अनियमितपणा यामुळे उत्पादकता कमी आहे.

राज्यामध्ये कपाशी पिकाच्या एकूण क्षेत्रापैकी जवळपास ९५ टक्के क्षेत्रावर बीटी वाणाची लागवड केली जाते. बीटी कापूस उत्पादनाच्या दृष्टीने वाण निवड ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यासाठी वाण निवड करताना सर्व बाबींचा विचार करून लागवडीसाठी वाण निवडावा.

वाण कसे असावे?

- वाण निवडताना जमिनीची पोत, लागवडीचा प्रकार व वाणाचे गुणधर्म यांचा विचार करावा.

- अधिक उत्पादनक्षम तसेच बोंडगळ व बोंडसड कमी प्रमाणात होणारा वाण असावा.

- रस शोषण करणाऱ्या किडींना प्रतिकारक्षम व रोगांना बळी न पडणारा संकरित वाण असावा.

- पाण्याचा ताण सहन करणारा वाण निवडावा.

- धाग्याची प्रत चांगली असणारा आणि बोंडे चांगली फुटणारा वाण निवडावा.

- बोंडाचा आकार कोरडवाहू लागवडीसाठी मध्यम तर बागायती लागवडीसाठी मोठा असणारा वाण निवडावा.

- गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून लवकर वेचणीसाठी तयार होणारा वाण निवडावा.

- सघन लागवडीसाठी उंची व फांद्यांची लांबी कमी असणारा वाण असावा.

- शेवटपर्यंत पाने हिरवी राहिल्यास अन्न तयार करण्याचे काम अखेरपर्यंत चालते. त्यामुळे उशिरा लागणाऱ्या बोंडाचा आकार सुद्धा मोठा राहतो, तसेच बोंड फुटण्याचे प्रमाण वाढते.

- कोरडवाहू लागवडीसाठी कमी ते मध्यम (१४० ते १६० दिवस) तर बागायतीसाठी दीर्घ कालावधीच्या (१६० ते १८० दिवस) वाणाची निवड करावी.

- बोंडाचे वजन व बोंडे धारणक्षमता तसेच बोंडे धारण फांद्यांची संख्या जास्त असलेला वाण असावा.

संपर्क - डॉ. एस.एन पोतकिले, ९४२२२८४८३४, (कृषिविद्यावेत्ता, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Damage: पंजाबमध्ये १.८४ लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान

Electricity Subsidy: उपसा योजनांना वीजबिलात आणखी दोन वर्षे सवलत

Maharashtra Rain: राज्यात पावसाची उघडीप शक्य

Paddy Crop Damage : मुसळधार पावसामुळे भातपीक कुजण्याचा धोका

Zero Tillage: मातीची सुपीकता वाढवणारी शून्य मशागत खर्चाची बचत कशी करते

SCROLL FOR NEXT