Vasantrao Naik Agrowon
ॲग्रो विशेष

Vasantrao Naik Awards: वसंतराव नाईक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

Kisan Samman: हरितक्रांतीचे प्रणेते, भूमिपुत्र, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतिनिमित्त दर वर्षी १८ ऑगस्ट रोजी विक्रमी उत्पादन घेणाऱ्या निवडक कर्तबगार शेतकऱ्यांचा तसेच कृषी शास्त्रज्ञांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येतो.

Team Agrowon

Yavatmal News: हरितक्रांतीचे प्रणेते, भूमिपुत्र, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतिनिमित्त दर वर्षी १८ ऑगस्ट रोजी विक्रमी उत्पादन घेणाऱ्या निवडक कर्तबगार शेतकऱ्यांचा तसेच कृषी शास्त्रज्ञांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येतो. यंदाच्या पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

विदर्भ, मराठवाडा, प. महाराष्ट्र, खानदेश व कोकण अशा विभागांतून विभागनिहाय शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत विविध प्रयोग करून विक्रमी उत्पादन आणि अधिक नफा प्राप्त केला असल्यास आपला बायोडेटा पाठवावा. त्यामध्ये खर्च किती, उत्पादन (टनामध्ये) किती व बाजारपेठेत विक्री केल्यानंतर निव्वळ नफा किती झाला याची सविस्तर माहिती द्यावी.

या वर्षी कृषी शास्त्रज्ञांकरिता ‘उसाचे उत्पादन वाढण्याकरिता केलेल्या विशेष संशोधन कार्याबद्दल’ हा विषय निवडला आहे. ज्यांनी उसाचे उत्पादन वाढीकरिता विशेष संशोधनात्मक कार्य केलेले आहे, अशाच शास्त्रज्ञांनी त्यांचा बायोडेटा आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावा.

शेतकऱ्यांना समाज माध्यमांद्वारे नियमित कृषिविषयक मार्गदर्शनाबद्दल पुरस्कार ः शेतकऱ्यांना नियमित (फेसबुक, यू-ट्यूब, इन्स्टाग्राम) या समाज माध्यमाद्वारे कृषीविषयक मार्गदर्शन करणाऱ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावा.

कृषी संबंधित विषयावर कार्य करणाऱ्या शेतकरी, उत्पादक कंपनी, बचत गट व सामूहिक शेती करणाऱ्यांनी देखील सविस्तर माहितीसह प्रस्ताव पाठवावा.वरील सर्वांनी आपले प्रस्ताव दोन पासपोर्ट फोटोसह ५ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोहोचतील, अशा बेताने पाठविण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे.

पत्रव्यवहारासाठी पत्ता

अध्यक्ष, वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान, पुसद, श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयासमोर, पुसद : ४४५२०४, जि. यवतमाळ

अधिक माहितीसाठी संपर्क नंबर

अधिक माहितीसाठी उत्तमराव जाधव, कार्यालय प्रमुख मोबा. : ७५८८०४३०३६, धनंजय सोनी, कार्याध्यक्ष ९९६०९०७९८०, प्रा. गोविंद फुके, प्रमुख मार्गदर्शक : ९८२२४६६९०२ यांच्याशी संपर्क साधता येईल. अथवा vppusad@gmail.com ई-मेलवर देखील संपर्क साधता येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MahaDBT: ‘डीबीटी’त चुकीची माहिती दिल्यास पाच वर्षे बंदी

Cotton Picking Wages: खानदेशात कापूस वेचणी मजुरीदर स्थिर

Agricultural Loss: नऊ वर्षांत ६४० लाख हेक्टरवरील पिकांचा घास

Air Pollution: वायू प्रदूषणामुळे देशात १८ टक्के मृत्यू

Farmer Issue: कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही सावरू शकत नाही

SCROLL FOR NEXT