
Mumbai News: वसंतराव नाईक कृषी संशोधन आणि ग्रामीण प्रतिष्ठानच्या वतीने देणाऱ्या विविध कृषी पुरस्कारांची बुधवारी (ता. २५) घोषणा करण्यात आली. गडचिरोलीच्या विज्ञान व तंत्रज्ञान संशोधन केंद्राला एक लाखाचा, तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा यांना कृषी उल्लेखनीय योगदानाबद्दल ५० हजार रुपयांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
‘ॲग्रोवन’चे उपमुख्य बातमीदार मनोज कापडे यांना कृषी पत्रकारितेसाठी पुरस्कार जाहीर करण्यात आला. प्रतिष्ठानने जाहीर केलेल्या पुरस्कारांमध्ये बहुतांश पुरस्कार ‘ॲग्रोवन’मधून यशकथा प्रसिद्ध झालेल्या शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आले आहे.
प्रत्येकी ३५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या ११२ व्या जयंतीदिनी १ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
अन्य पुरस्कारांमध्ये कृषी शास्त्रज्ञ व साहित्य पुरस्कार लिंबूवर्गीय फळे संशोधन केंद्र नागपूरच्या डॉ. दिलीप घोष यांना, सोलापूरमधील उळे येथील उळे शेतकरी उत्पादक कंपनीला कृषी निर्यात पुरस्कार, बीडमधील सोलापूरवाडीच्या हनुमंत गावडे यांना फलोत्पादन पुरस्कार जाहीर करण्यात आला.
पत्रकार परिषदेला राज्यमंत्री इंद्रनील नाईक, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले, सचिव दीपक पाटील, प्रिया पवार, ‘सीईओ’ शशिकांत तुळये आदी उपस्थित होते
अन्य पुरस्कार
भाजीपाला व रोपवाटिका संवर्धन पुरस्कार : नानाजी जाधव, अंतापूर, नाशिक
दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धन पुरस्कार : भाऊसाहेब भोसले : धामणी, इगतपुरी
जलसंधारण पुरस्कार : उपेंद्र धोंडे, रावेत प्राधिकरण, पुणे
आधुनिक फुलशेती पुरस्कार : गणेश वाघ, जानोरी, दिंडोशी
आधुनिक स्टार्टअप पुरस्कार : महेक अली, सय्यद अली : निजामपूर, अचलपूर
सामाजिक वनीकरण पुरस्कार : शेखर गायकवाड, मातोफी कॉलनी, नाशिक
महिला केंद्रित ग्राम विकास पुरस्कार : इंदुजा महिला दुग्ध उत्पादक कंपनी, मुरली, यवतमाळ
पुनरुज्जीवित शेती पुरस्कार : रामचंद्र पुंड, बाजार सांगवी, संभाजीनगर
नावीन्यपूर्ण शेतकरी पुरस्कार : रोहन उरसाल, जाधववाडी दिवे, पुरंदर
कृषी प्रक्रिया पुरस्कार : विनोद जोगदंड, अध्यक्ष निर्मल, मिल्क खवा क्लस्टर, भूम, धाराशिव
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.