डॉ. रणजित इंगोले, डॉ. भूपेश कामडीWinter Disease in Goats: हिवाळ्यामध्ये शेळ्यांमध्ये फुप्फुसदाह आजार दिसतो. दुर्लक्ष केल्यास हा प्राणघातक आजार आहे. या आजारामध्ये शेळ्यांना श्वसनाचा त्रास होतो, शेळ्या वेगाने व कष्टाने श्वास घेतात. खोल, ओलसर, वेदनादायक खोकला येतो, शेळ्या तोंड उघडून श्वास घेतात, छातीतून घरघर असा आवाज येतो. योग्य व्यवस्थापन, ताणतणाव नियंत्रण, वेळेवर निदान आणि तत्काळ उपचार आवश्यक आहेत..फुफ्फुसदाह हा हिवाळ्यात शेळ्यांमध्ये आढळणारा अतिशय गंभीर व जीवघेणा श्वसनसंस्थेचा आजार आहे. हा आजार विशेषतः हिवाळ्यात, थंडी, ओलावा, गर्दी आणि योग्य व्यवस्थापनाच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणात शेळ्यांमध्ये पसरतो. लहान पिल्ले, गरोदर शेळ्या व अशक्त शेळ्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असते. आजारी शेळीमध्ये वेळेवर उपचार न झाल्यास हा आजार शेळ्यांमध्ये जीवघेणा ठरू शकतो..निरोगी फुप्फुसांची कार्यक्षमता बिघडल्यास श्वसनास त्रास होतो. आजार वाढत गेल्यास एंडोटॉक्सिमिया आणि सेप्टीसीमिया होऊ शकतो. फुप्फुसांच्या पृष्ठभागावर आणि छातीच्या पोकळीच्या आतील आवरणावर दाह झाल्यास (प्ल्युरायटिस) तीव्र वेदना होतात. फुप्फुसांचा मोठा भाग बाधित झाल्यास साधारणपणे ७० टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजनअभावी (अॅनॉक्सिया) मृत्यू होऊ शकतो, किंवा टॉक्सिमियासह तीव्र सर्वांगीण संसर्गामुळेही शेळीचा मृत्यू होऊ शकतो. शेळ्यांमध्ये फुप्फुसदाह होण्याची प्रमुख कारणे म्हणजे जिवाणू, विषाणूंच्या प्रादुर्भावासोबत शेळ्यांमध्ये ताणतणाव निर्माण करणारे घटक, दुय्यम संसर्ग इत्यादीचा समावेश असतो..Goat Farming: मामा, भाच्याचे किफायतशीर शेळीपालन.संसर्गजन्य रोगकारकेजिवाणू :Pasteurella multocida, Mannheimia haemolytica, Mycoplasma हे जिवाणू बहुतेक वेळा शेळ्यांच्या श्वसनमार्गात नैसर्गिकरीत्या वास्तव्यास असतात; पण जर शेळीची रोग प्रतिकारशक्ती कमी झाली तर फुप्फुसदाह आजार निर्माण करतात..विषाणू :Parainfluenza-३ (PI-३), Respiratory Syncytial Virus (RSV), Adenoviruses, and Herpesviruses, सोबतच CAEV (Caprine Arthritis-Encephalitis), PPR and JSRV (Jaagsiekte Sheep Retrovirus) हे विषाणू फुप्फुसांच्या संरक्षणात्मक पेशींना नुकसान करतात.त्यामुळे जिवाणूंना वाढण्याची संधी मिळते. परिणामी शेळ्यांना फुप्फुसदाह होतो. शेळ्यांना बहुतेक वेळा विषाणूजन्य संसर्गानंतर जिवाणूजन्य फुप्फुसदाह होतो.ताणतणाव निर्माण करणारे घटकशेळ्यांमध्ये फुप्फुसदाह होण्यामागे तणाव मुख्य कारण ठरू शकते. शेळ्यांना तीव्र थंडी व वारा, ओलसर व थंड गोठा, खराब/ घातक वायू (अमोनियाचा वास), कमी जागेत जास्त गर्दी, अचानक हवामानात होणारा बदल, शेळ्यांची एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहतुकीमुळे ताण येतो. अपुरे पोषण, ओले गादी व शेण साचणे इत्यादीमुळे शेळ्यांना ताण येतो. शेळ्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी होऊन शेळ्या फुप्फुसदाह आजारास बळी पडतात..Goat Farming : बंदिस्त शेळीपालनात खाद्य, आरोग्य व्यवस्थापनावर भर.दुय्यम संसर्गफुप्फुसातील कृमी, आधीचा विषाणू संसर्ग हे घटक फुप्फुसांचे संरक्षण कमी करतात आणि फुप्फुसदाह आजाराचे प्रमाण तीव्र करतात.प्रमुख लक्षणेफुप्फुसदाह झालेल्या शेळ्यांमध्ये दिसणारे सर्वांत प्रथम लक्षण म्हणजे शेळ्यांच्या शरीराचे तापमान वाढते, शेळ्यांना १०४ ते १०६ अंश फॅरानहाइटपर्यंत ताप येतो.शेळ्यांना श्वसनाचा त्रास होतो, शेळ्या वेगाने व कष्टाने श्वास घेतात. खोल, ओलसर, वेदनादायक खोकला येतो, शेळ्या तोंड उघडून श्वास घेतात, छातीतून घरघर असा आवाज येतो..नाक व डोळ्यांमधून स्त्राव येतो. होतो. हा स्त्राव पारदर्शक पाण्यासारखा असतो. नंतर पिवळा,हिरवट,पूयुक्त स्त्राव स्रवण्यास सुरवात होते. नाकाभोवती सुकलेली घाण जमा झालेली दिसते, तसेच डोळ्यांना सूज येणे व डोळ्यात पाणी येते इत्यादी.शेळ्यांमध्ये दिसणाऱ्या सर्वसाधारण लक्षणांमध्ये प्रामुख्याने शेळ्यांना अशक्तपणा व सुस्ती जाणवते. शेळी कळपापासून वेगळी उभी राहते. मान खाली घालते, चारा खात नाही, फुप्फुसात पाणी साचल्यामुळे झोपायला टाळाटाळ करते. सरतेशेवटी शेळीचे वजन घटते..निदानआजाराचे निदान प्रामुख्याने शेळ्यांमध्ये दिसणारी लक्षणे, ताप मोजणे, श्वसनगती तपासणे, कळप व्यवस्थापनाचा इतिहास, प्रयोगशाळेत नाक स्रावाची व रक्त तपासणी करून तसेच मृत शेळीचे शवविच्छेदन करून करता येते..प्रतिबंध आणि नियंत्रणफुप्फुसदाह होऊ नये यासाठी शेळीपालनात दैनंदिन व्यवस्थापन चांगले असावे.गोठे स्वच्छ व कोरडे असावेत. त्याची नियमित स्वच्छता करावी, गोठ्यांमध्ये शेळ्यांची गर्दी टाळावी. ताण तणाव येणार नाही याची काळजी घ्यावी.शेळ्यांचे थंडीपासून संरक्षण करावे, खाद्यात अचानक बदल करू नये, हिवाळ्यात वाहतूक टाळावी. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने नियमित जंतनाशके द्यावीत, कळपात नवीन शेळ्यांना वेगळे ठेवावे, आजारी जनावरांना त्वरित विलगीकरण करून पशुवैद्यकाकडून स्वतंत्र उपचार करावे..लसीकरणशेळ्यांमध्ये फुप्फुसदाह प्रामुख्याने Pasteurella multocida आणि Mannheimia haemolytica या जिवाणूमुळे होतो. यापासून संरक्षणासाठी पाश्चरिलोसिस (Hemorrhagic Septicemia / Pasteurella) लस करडांना ३ ते ४ महिन्यांच्या वयात द्यावी. त्यानंतर बूस्टर मात्रा पहिल्या मात्रेनंतर ३ ते ४ आठवड्यांनी द्यावी. वार्षिक लस वर्षातून एकदा पावसाळ्यापूर्वी देणे आवश्यक आहे.पीपीआर या अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजारापासून संरक्षणासाठी पीपीआर लस द्यावी. पहिली मात्रा करडांना ३ महिन्यांच्या वयात तर बूस्टर मात्र ३ वर्षांनी एकदा द्यावी..उपचारआजाराची पहिली लक्षणे दिसताच पशुवैद्यकांच्याकडून तातडीने शेळीवर औषधोपचार करावा. फुप्फुसदाह लवकर बरा होण्यासाठी आजारी शेळी वेगळी, उबदार, कोरड्या व हवेशीर जागेत ठेवावी. उत्तम प्रतीचा कोरडा चारा, स्वच्छ, कोमट पाणी द्यावे. पूरक उपचार केल्यास शेळी लवकर बरी होते.हिवाळ्यातील फुप्फुसदाह हा टाळता येण्याजोगा पण दुर्लक्ष केल्यास प्राणघातक आजार आहे. योग्य व्यवस्थापन, ताणतणाव नियंत्रण, वेळेवर निदान व तात्काळ उपचार हे शेळ्यांचे आरोग्य व उत्पादन टिकवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत.डॉ. रणजित इंगोले ९८२२८६६५४४(प्राध्यापक व विभाग प्रमुख,पशुविकृती शास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, अकोला).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.