सुरुवातीच्या कलानुसार, अनेक ठिकाणी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आघाडीवरकोल्हापूर- चंदगड नगर पंचायतीच्या भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनिल काणेकर विजयी श्रीवर्धनमध्ये सुनील तटकरे यांना धक्का, येथे ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेतकणकवली नगरपंचायत निवडणुकीत पहिल्या फेरीत भाजपचे ४ उमेदवार विजयीरत्नागिरी - महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे दुसऱ्या फेरीमध्ये ३ हजार मतांनी आघाडीवरत्र्यंबकेश्वरमध्ये अजित पवारांच्या गटाकडून विजयाचा जल्लोष सुरु.Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Elections Result: राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायती निवडणुकीच्या मतमोजणीला आज रविवारी (दि. २१ डिसेंबर) सकाळी १० वाजता सुरुवात झाली. दुपारपर्यंत सर्व जागांचे निकाल हाती येण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत मतदारांचा कौल कुणाला? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. २६४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान पार पडले होते. तर उर्वरित २४ नगरपरिषदा, नगरपंचायती आणि १५४ सदस्यपदाच्या जागांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान झाले..काही ठिकाणी भाजपसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामुळे, आज एकूण २८७ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत महायुतीतील भाजप, शिंदे शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे घटक पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात लढले आहेत. यामुळे मतदानादरम्यान अनेक ठिकाणी संघर्ष पाहायला मिळाला. तसेच बोगस मतदान, ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचा अनेक घटना घडल्या..Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Elections Result: राज्यातील २८८ नगरपरिषदा, नगरपंचायतींचा आज फैसला.दरम्यान, सोलापूरमधील अक्कलकोट येथे मतमोजणीला सुरुवात होण्याआधीच भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटक्यांची आतषबाजी केली. यावेळी त्यांनी जल्लोष केला. अक्कलकोटमध्ये भाजप, शिंदे शिवसेना, काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत होत आहे. .Maharashtra Local Body Elections: कुठे 'ईव्हीएम'मध्ये बिघाड, कुठे बोगस मतदान, जादूटोण्याचा प्रकारही उघडकीस.बीडमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर मोठी गर्दी झाल्याने गोंधळ उडाला. उमेदवारांच्या प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रात सोडण्यावरून वाद झाला. पोलिसांनी गर्दीला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केल्याची माहिती समोर आली आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.