Vegetable Market Rate agrowon
ॲग्रो विशेष

Vegetable Market Rate : कोबी वधारला; काकडी उतरली, कांदा, बटाटा, लसूण स्थिर; आंबा स्वस्त

Mango Rate : कांदा, बटाटा, लसणाचे दर स्थिर आहेत. फळभाजारात स्थानिक आवक वाढल्याने आंबे स्वस्त आहेत.

sandeep Shirguppe

Agriculture News : मागच्या सहा महिन्यात कोबीला दर नसल्याने कोबी उत्पादक शेतकरी तोट्यात होता परंतु उसाच्या लावणीतील कोबीची आवक कमी झाल्याने कोबीच्या दरात सुधारणा झाली आहे. तीन महिन्यांपासून उष्म्यामुळे वाढलेल्या काकडीचे दर ढगाळ वातावरणामुळे उतरले आहेत. कोथिंबीरीचा भाव कडाडला आहे.

टोमॅटोची वाढलेली आवक कायम आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांदा, बटाटा, लसणाचे दर स्थिर आहेत. फळभाजारात स्थानिक आवक वाढल्याने आंबे स्वस्त आहेत. जनावरांच्या बाजारात उलाढाल जेमतेम आहे.

कोबी दहा किलोमागे ६० रुपयांनी तर किळकोळ बाजारात २५ रुपये किलो असा दर वधारला. हिरवी मिरची, ढब्बू, कारली यांचा दर दहा किलामागे १०० रुपयांनी उतरला. वळवाची हजेरी आणि ढगाळ वातावरणामुळे काकडीचा दर उतरला आहे. किलोमागे दहा रुपयांनी दर कमी झाले आहेत. कांदा २० ते ३५, बटाटा २५ ते ४०, लसूण १२५ ते २४० रुपये किलो असा दर स्थिर आहे.

कोंथिंबीरीचा १०० पेंढ्यांचा दर २३०० रुपयांवर पोहोचला. परिणामी, पेंढीचा दर ३० ते ४० रुपये असा कडाडला आहे. मेथी २० तर लाल भाजी १५ रुपये पेंढी होती. लिंबूचा शेकडा ३०० ते ५०० रुपये दर आहे. नगाला ५ ते ७ रुपये भाव होता. चिंच, करंजीची आवक कमी झाली आहे. फळबाजारात कोकणातील हापूस आंब्याची आवक कमी होत असून, स्थानिक वाढल्याने दर स्वस्त आहेत. डझनाचा दर २५० ते ४०० रुपये असा होता.

संत्री १२०, माल्टा १४० तर सफरचंद १५० ते २५० रुपये किलो होते. जनावरांच्या बाजारात दोन महिन्यांपासून उष्म्यामुळे मागणी ८० टक्क्यांनी थंडावली आहे. चाऱ्याच्या कमतरतेमुळे व्यवहार जेमतेम आहेत. यात्रांचा हंगाम झाल्याने बकऱ्यांची मागणीही कमी झाली आहे. म्हशींची ३० तर शेळ्या-मेंढ्याची ३५ आवक नोंदली. पाऊस सुरू होऊन हिरवा चारा आल्यावरच जनावरांच्या बाजारात आवक पूर्ववत होईल.

तांदळाची आवक घटली

येथील मारुती मंदिर परिसरात तांदळाचा बाजार भरतो. ग्रामीण भागातील शेतकरी येथे तांदूळ विक्रीसाठी आणतात. खात्रीचा थेट उत्पादकाकडून तांदूळ मिळत असल्याने येथे खरेदी करणारा खास ग्राहक वर्ग आहे. आक्टोबरपासून या बाजारात आवक वाढते. विविध जातींनुसार ४० ते ८० रुपयापर्यंत किलोचा दर होता. शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीत गुंतल्यामुळेच आवक घटल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

Satana APMC: सटाणा बाजार समितीमध्ये भरती रद्द करण्याच्या हालचाली

Farmers Protest: बारदानाअभावी गहू खरेदी ठप्प, दोन दिवस रांगेत उभ्या शेतकऱ्यांचा संयम सुटला

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये सुधारणा; कापसातील वाढ कायम, कलिंगडाची आवक टिकून, मोहरीच्या भावात तेजी तर कांदा दबावातच

Farm Road Opens: अतिक्रमणमुक्ती मोहिमेत पाणंद-शेतरस्ते खुले

SCROLL FOR NEXT