Agriculture Water Dams : कोल्हापुरातील मोठ्या धरणांत गतवर्षीपेक्षा जास्त पाणीसाठी, वळीव पावसाने दिलासा

Kalammavadi Dam Water : १८ मे अखेर राधानगरीसह, काळाम्मावाडी व तुळशी धरणात गतवर्षी इतकाच म्हणजे ६.२५ टीएमसी पाणीसाठा आहे.
Agriculture Water Dams
Agriculture Water Damsagrowon

Kolhapur Dam Water : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या आठ दिवसात वळीव पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. दरम्यान झालेल्या पावसाने शेती पिकांसाठीची पाण्याची आर्वतने एका आठवड्याने पुढे गेली आहेत. यामुळे धरणातील पाण्यासाठ्यावर असलेला अतिरिक्त ताण कमी झाला आहे. पाटबंधारे विभागाने उपसाबंधीच्या घेतलेल्या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते परंतु यंदा वळीव पावसाने साथ दिल्याने पिकांना दिलासा मिळाला आहे.

राधानगरीसह काळम्मावाडी व तुळशी धरणाच्या लाभ क्षेत्रातील संभाव्य पाणी उपसाबंदीचा प्रश्‍‍न निकाली निघाला आहे, तर तीनही धरणांतील उपलब्ध साठ्यातील पाणी वापरावरील ताण दूर झाला आहे. वळवाने शेतीसाठी पाणी वापरच कमी झालाच त्याचबरोबर मॉन्सूनचा पाऊस सुरू होईपर्यंत पाणी कमतरतेची शक्यता धूसर बनवली आहे.

१८ मे अखेर राधानगरीसह, काळाम्मावाडी व तुळशी धरणात गतवर्षी इतकाच म्हणजे ६.२५ टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षी पाणीसाठा ६.१८ टीएमसी होता. यंदा काळम्मावाडीत गतवर्षीपेक्षा अधिक, तर राधानगरीत अर्धा टीएमसीने कमी आहे. तुळशी जवळपास गतवर्षी इतकाच पाणीसाठा आहे. तीनही धरणांतून विशिष्ट प्रमाणात विसर्ग सुरूच आहे.

वळवाने शेतीसाठी पाणी उपसा होत नसल्याने भोगावती, दूधगंगा व तुळशी या मे महिन्यातही भरून वाहत आहेत. वळवाने शेतीसाठी पाण्याची मुबलकता झाल्याने या पुढील काळात मॉन्सून वेळीच सुरू झाल्यास, शेतीसाठीचे एक आवर्तन वाचणार आहे. त्यामुळे तीनही धरणांत वापरायोग्य पाणीसाठा शिल्लक राहिल, अशीच सद्यस्थिती आहे.

गतवर्षी वळवाचे प्रमाण कमी राहिल्याने आणि मॉन्सून पाऊस उशिरा सुरू झाल्याने पाणीटंचाईसदृश स्थिती उद्‌भवली होती, मात्र यंदा तशी स्थिती टळण्यास वळीव पाऊस अत्यंत उपयुक्त ठरला आहे.

धरणांतील पाणीसाठा दृष्टिक्षेपात

१८ मे २०२४

राधानगरी - १.७८ टीएमसी

तुळशी - १.२५ टीएमसी

काळम्मावाडी - ३.१२ टीएमसी

१८ मे २०२३

राधानगरी- २.२१ टीएमसी

तुळशी -१.१८ टीएमसी

काळम्मावाडी -२.७९ टीएमसी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com