Market Price Kolhapur : कोथिंबिरीची पेंढी ४० रुपयांना, लोणच्याच्या आंब्यांना मागणी

Vegetable Market : कोथिंबीर पेंढीचा दर ४० रुपयांवर पोहोचला असून, मेथीच्या दरातही वाढ झाली आहे.
Market Price Kolhapur
Market Price Kolhapuragrowon
Published on
Updated on

Kolhapur Market Rate : उन्हाळाच्या कडाका आणि अचानक आलेल्या वळवाच्या पावसाने भाजीपाला आणि फळबागांचे मोठे नुकसान झाल्याने भाज्याची आवक बाजारात कमी होत असताना दिसत आहे. मे महिन्याच्या मध्यानंतर मुहूर्त नसल्याने समारंभांना ब्रेक लागला. त्यामुळे मागणीत मोठी घट झाली आहे. परिणामी आता फळभाज्यांचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पालेभाज्यांचे भाव कडकच आहेत. कोथिंबीर पेंढीचा दर ४० रुपयांवर पोहोचला असून, मेथीच्या दरातही वाढ झाली आहे. हंगामी आंबाडा भाजीची आवक आणि मागणीही चांगली आहे.

बाजार समितीत कांद्याच्या आवकेत काहीशी घसरण झाल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे काही दिवसांत दर वाढण्याची चिन्हे आहेत. लोणच्याच्या आंब्यांना मागणी वाढली आहे. शहरातील बाजारासह ठिकठिकाणी हे आंबे विक्रीस आहेत. आठवडी बाजारात लोणच्याच्या आंब्यांची जाग्यावरच फोडून विक्री होत आहे. फूलबाजारात मागणी नसल्याने दर चांगलेच पडले आहेत. निशिगंधसह अन्य फुलांच्या दरात दुप्पट ते तिप्पट वाढ झाली आहे.

प्रतिकिलो रुपये भाजीपाला

टोमॅटो- २० ते ३०, दोडका- ५० ते ६०, वांगी - ८० ते १००, कारली- ५० ते ६०, ढोबळी मिरची- ८० ते १००, मिरची -८० ते ९०, फ्लॉवर - ३० ते ४०, कोबी- २० ते २५, बटाटा- ३० ते ३५, कांदा - २५ ते ३०, लसूण- २०० ते २४०, आले- १०० ते १२०, लिंबू - २०० ते ६०० शेकडा, गाजर - ५० ते ६०, बीन्स- २५० ते ३००, गवार -८० ते १००, वरणा शेंगा - ६० ते ८०, भेंडी- ५० ते ६०, काकडी- ५० ते ६०, दुधी - २० ते ३०, हिरवा वाटाणा - ७० ते ८०, पालेभाज्या - २०, कोथिंबीर, मेथी - ३० ते ३५, शेवगा - २ ते ३ रुपये नग.

फुले : झेंडू - ८० ते १००, निशिगंध - १५० ते २००, गुलाब - २०० ते ३००, गलांडा - १०० ते १२०, शेवंती - १५० ते १८०.

Market Price Kolhapur
Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्याला वळवाचा तडाखा, पूर्व, दक्षिण भागात जोरदार पाऊस

फळे : सफरचंद - २५० ते ४००, संत्री - १२० ते १३०, मोसंबी- १०० ते १२०, डाळिंब- १२० ते २००, चिकू- १०० ते १२०, पेरू- ५० ते ८०, खजूर -१५० ते २००, पपई- ४० ते ५०, मोरआवळा -१०० ते १२०, सीताफळ - ८० ते १००, कलिंगड - ५० ते ६०, टरबूज -४० ते ६०, केळी - ५० ते ६० डझन, देशी केळी - ७० ते ८० डझन, किवी - १४० ते १५०, चिंच-१०० ते १४०, अननस -४० ते ५०, अंजीर -८०-१००.

खाद्यतेल : सरकी - १०८ ते ११२, शेंगतेल - १७४ ते १८०, सोयाबीन - १०८ ते ११२, पामतेल - १०८ ते ११४, सूर्यफूल - १०८ ते ११२.

कडधान्य : हायब्रीड ज्वारी- ३१ ते ३७, बार्शी शाळू- ३२ ते ५५, गहू - ३२ ते ४०, हरभराडाळ - ७८ ते ८३, तूरडाळ- १५५ ते १६५, मूगडाळ - ११० ते ११५, मसूरडाळ - ७८ ते ८२, उडीदडाळ - १२२ ते १३०, हरभरा- ७०, मूग- १०० ते ११०, मटकी- १०० ते ११०, मसूर- ७०, फुटाणाडाळ - ८३ ते ८५, चवळी- ८८, हिरवा वाटाणा- ९०, छोले -१४० ते १६०.

वरणा, घेवडा नाहीच

वरणा, घेवडा या फळभाज्यांची नेहमी उन्हाळ्यातही कायम तेजीत आवक असायची. यंदा मात्र दोन्ही भाज्या बाजारात शोधून सापडेना झाल्या आहेत. पाणी नसल्याने या भाज्यांचे उत्पादन न घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल राहिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com