Cotton Rate agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Rate : सरकारची मानसिकता बदलेल का? जाचक अटी व मापदंडामुळे कापूस खितपत

Cotton Farmers : कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे २५० ते ३०० लाख क्विंटल कापूस विक्रीसाठी उपलब्ध आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Agriculture News : कापूस उत्पादकांना न्याय देण्यासाठी शासनाने जाचक अटी शिथिल करून कापूस पणन महासंघाने मागितलेली परवानगी व कापूस खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या अर्थसहाय्यासाठी हमी घेणे आवश्यक आहे. कोरोना महामारीच्या विपरीत परिस्थितीत महाविकास आघाडी सरकारने कापूस खरेदी केला. पण सद्य:स्थितीत महायुतीचे सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्यात अपयशी ठरले असून कापूस उत्पादकांना न्याय देण्याच्या दृष्टीने सरकारने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे २५० ते ३०० लाख क्विंटल कापूस विक्रीसाठी उपलब्ध आहे. तरीही फक्त ११ लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली आहे. यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे कापसामध्ये ओलावा निर्माण होऊन त्याची प्रतवारी कमी झाली आहे. सी.सी. आय. च्या जाचक अटी व मापदंडामुळे कापूस खरेदी केला जात नाही. सद्यःस्थितीत कापूस उत्पादकांच्या घरात मोठ्या प्रमाणात विक्री करीता कापूस पडून आहे.

राज्यात १०९ खरेदी केंद्र प्रस्तावित असून त्यापैकी ९० केंद्रांना खरेदीची परवानगी देण्यात आली आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दरात नाईलाजाने कापूस विकावा लागत आहे.

आम्ही कापूस खरेदी करु, शेतकऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी भावाने कापूस विकू नये, असे आवाहन उपमुख्यत्र्यांनी केले आहे. त्यामुळे कापूस उत्पादक संभ्रमात आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, कापूस पणन महासंघाचे मागील खेरदीच्या व्यवसायामधील रु. १०१.७२ कोटी केंद्र शासनाकडून येणे आहे. हा निधी प्राप्त झाल्यानंतरच पणन महासंघाकडून कापूस खरेदी प्रक्रिया सुरु होऊ शकते. त्यामुळे राज्य शासनाने हा निधी कापूस पणन महासंघाला तात्काळ उपलब्ध करुन दिला पाहिजे, तरच कापूस खरेदी करण्यासाठी कर्ज उपलब्ध होऊ शकेल असेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT