Save Water Agrowon
ॲग्रो विशेष

Water Awareness : पाणी बचतीने मानवाचे भविष्य पाण्यासारखे उज्ज्वल होईल

Director General of Water and Land Management Institute V.B. Nath :नवअभियंत्यासह पाण्याचा वापर करणाऱ्या सर्व नागरिकांनी पाण्‍याची बचत व संधारण केले तर निश्‍चितच मानवाचे भविष्य पाण्यासारखे उज्ज्वल होईल,

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : नवअभियंत्यासह पाण्याचा वापर करणाऱ्या सर्व नागरिकांनी पाण्‍याची बचत व संधारण केले तर निश्‍चितच मानवाचे भविष्य पाण्यासारखे उज्ज्वल होईल, असे मत जल व भूमी व्यवस्थापन संस्था वाल्मीचे महासंचालक वि. बा. नाथ यांनी केले.

वाल्मी येथे १६ ते २२ मार्च दरम्यान जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी (ता. २२) त्याच्या सांगता कार्यक्रमात श्री. नाथ बोलत होते. या वेळी व्यासपीठावर संस्थेतील सामाजिकशास्त्रे विद्याशाखा प्रमुख डॉ. राजेश पुराणिक, एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास व व्यवस्थापन विद्याशाखा प्रमुख डॉ. डी. जी. दुरबुडे, प्रशासकीय अधिकारी एस. पी. लब्बा उपस्थित होते.

महासंचालक श्री. नाथ म्हणाले, की लोकांचे होणारे पाण्याचे हाल थांबण्यासाठी पाण्याचे महत्त्व जाणून प्रत्येक पाणी वापरकर्त्याने आजपासूनच पाणी बचत केली पाहिजे. सामान्य माणूस पाण्याचा जास्तीत जास्त वापर आणि अपव्ययही करतो. हे टाळून जलसंधारणाची कामे करून भूजल पातळी वाढवण्याचा प्रयत्न व्हावा. शेतीतही वाया जाणा-या पाण्याचा पाट थांबवत धरणातील गाळ काढून शेतामध्ये सुपीकता व कस वाढविण्यावर भर द्यावा ज्यामुळे पीक चांगले येईल व शेतकऱ्यांची आर्थिक संपन्नता वाढेल. गाळ काढल्यामुळे धरणातील पाणी पातळी देखील वाढेल आणि पाणीटंचाईवर कमी करता येईल, असेही ते म्हणाले.

जलजागृती सप्ताहानिमित्ताने २१ मार्च २०२४ रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध वयोगटांत शांततेसाठी पाणी याविषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ३ ते ६ वयोगटात प्रथम क्रमांक गार्गी पवार, द्वितीय समृद्धी क्षीरसागर, तृतीय क्रमांक प्रांजल थोरात, ७ ते १० वयोगटात प्रथम कृष्णवी वानखेडे, द्वितीय हिमानी चौधरी तृतीय तन्वी पाठक, ११ ते १५ वयोगटात प्रथम पूनम फुलगरे,

द्वितीय पलाश कुलकर्णी, तर तृतीय क्रमांक ज्योतिरादित्य साळुंके याने पटकावला. तसेच इतर सात उत्कृष्ट चित्रांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्रे देण्यात आले. ता. २२ मार्च रोजी सायक्लोथॉन स्पर्धा घेण्यात आली त्यातील विजेत्यांना प्रमाणपत्रे वितरित केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. राजेश पुराणिक यांनी जलजागृती सप्ताहचा गोषवारा सादर केला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. हर्षदा देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. मोहन नारखेडे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Shortage : खत टंचाईवरून कर्नाटकच्या विधानसभेत गोंधळ; एकेरी उल्लेख करत सत्ताधारी व विरोधक भिडले

MGNREGA Wages : पैसे द्या, पैसे द्या… ‘कुशल’चे पैसे द्या

Agriculture Electricity : शेतीपंपासाठी सिंगल फेज वीजपुरवठा वापरू नये

Orange Orchard : बुरशीजन्य देठसुकी, फांदी मर, फळगळ व्यवस्थापन

Agriculture Scheme: केंद्र सरकारकडून ठिबक, तुषार सिंचनासाठी मिळणार ५५ टक्क्यांपर्यंत अनुदान

SCROLL FOR NEXT