Water Awareness : स्वच्छ पाणी उपलब्धतेबाबत होऊया जागरूक

Article by Dr. Sumant Deshpande : आजही जगामध्ये २२० कोटी लोकांना स्वच्छ पाणी उपलब्ध नाही, हे सत्य आहे. आपल्या देशात देखील स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध नसणारी लोकसंख्या लक्षणीय आहे.
Water Awareness
Water AwarenessAgrowon

डॉ. सुमंत पांडे

World Water Day : आजही जगामध्ये २२० कोटी लोकांना स्वच्छ पाणी उपलब्ध नाही, हे सत्य आहे. आपल्या देशात देखील स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध नसणारी लोकसंख्या लक्षणीय आहे. आणि भविष्यात हे प्रमाण अधिक होईल यात शंका नाही. जलस्रोतांवर अतिक्रमण, भूपृष्ठ जलाचे प्रदूषण, वाळू, तत्सम गौण खनिजांचे शोषण आणि जैवविविधतेचा ऱ्हास ही प्रमुख कारणे आहेत.

पाण्याची मागणी, उपलब्धता आणि त्याचा पुरवठा यामधील प्रमाण गेल्या अनेक दशकापासून अधिकाधिक व्यस्त होत आहे. जागतिक स्तरावर मागील दोन शतकांपासून याचे परिणाम जाणवत आहेत. तथापि, आपल्या देशामध्ये मागील चार ते पाच दशकांपासून याची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढलेली जाणवते.

विश्‍वशांती आणि पाणी

या वर्षीच्या जागतिक जल दिनाचे औचित्य आहे ‘पाणी आणि विश्‍वशांती’. हे ध्येयवाक्य निश्‍चित करण्यामागे भूमिका अत्यंत व्यापक आणि सर्व देशांना लागू असणारी आहे. जागतिक स्तरावरील सध्या असलेले अशांततेचे वातावरण याला पुष्टी करते. मध्यपूर्वेतील अशांतता, रशिया आणि युक्रेन युद्ध, आशिया खंडातील अस्थैर्य या सर्वांना ही घोषणा पूरकच आहे. अलीकडे पाणी हे अशांतीच कारण बनत असल्याचे कारण आहे.

आपल्या देशामध्ये प्रत्येक जण उत्सव प्रिय आहे, समाजही उत्सव प्रिय आहे. मात्र जागतिक जल दिन आपण केवळ उत्सव म्हणून साजरा करावयाचा का, हा प्रश्‍न प्रत्येकाने आपण स्वतःला विचारणे गरजेचे आहे. दरवर्षी असा एक दिवस असावा, की ज्या दिवशी समस्त जगातील लोकांनी या विषयावर अत्मासंमुख व्हावे, ध्येय घोषणेवर लक्ष केंद्रित करून पुढील वर्षांमध्ये याच भूमिकेवर काम करणे असेही अपेक्षित आहे.

केवळ जागतिक जलदिनाच्या निमित्ताने पाण्याचे स्मरण करणे ही खरंतर आपल्या समाजाची शोकांतिका आहे. भारतीय समाजासाठी पाणी म्हणजेच जीवन, पाण्यामध्ये जीव, नद्या आपल्या माते समान. अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत पाण्याचा आपलं नातं असतं. ते अधोरेखित करणारी जीवनशैली आपल्या भारतीयांची आहे. समाज, धर्म, पंथ, जात कुठलीही असो प्रत्येकासाठी पाणी महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येकाच्या धर्मग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे.

Water Awareness
World Water Day : आठमाही सिंचनाचे नक्की काय झाले?

पाणी उपलब्धता आणि त्याचा वापर म्हणजे, मागणी आणि पुरवठा यामध्ये संतुलन असायला हवे. पाणी हे अक्षय स्रोत नाही. जर विवेकाने नाही वापरले तर ते संपणार आहे. महाराष्ट्राचे उदाहरण घ्यावयाचे झाल्यास भारतातील सर्वांत जास्त जलाशय (४१.८३ टक्के) महाराष्ट्रामध्ये आहेत. हे असे असतानाही महाराष्ट्रामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष सुमारे ७० टक्के भूभागावर जाणवते,

म्हणजेच विकेंद्रित पद्धतीने जलव्यवस्थापन ही गरज प्रकर्षाने जाणवते. जलाशयामधून जे उपलब्ध झालेले पाणी आहे, त्या पाण्याचा किती काटेकोर वापर केला जातो, हेही या निमित्ताने आपल्याला अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे गावोगावी जे जलस्रोत आहेत त्यांची आजची स्थिती काय आहे, हे देखील स्वराज्य संस्था आणि समाजाने लक्षात घेणे गरजेचे आहे.  

केपटाउन ते बंगळूरू

कर्नाटक राज्यातील बंगळूरू शहर आणि दक्षिण आफ्रिकेतील केपटाउन शहरातील पाणी दुर्भिक्षामध्ये काय साम्य आहे आणि त्याची करणे आणि उपाय आहेत याचेही सिंहावलोकन करणे आवश्यक आहे. सध्या बंगळूरू शहराची पाण्याची गरज आणि कावेरीतून पाण्याची उपलब्धता यात कमालीची तफावत आहे.

राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर विविध प्रकारे नियोजन झाले आहे. तथापि, त्याच्या अंमलबजावणीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर तफावत आहे, हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही. ही केवळ शासनाची भूमिका असायला नको, तर ती समाजाची भूमिका असायला हवी. पाण्याची जोपासना, योग्य वापर आणि पाण्याची काळजी सर्व समाजाने घेणे गरजेचे आहे.

Water Awareness
World Water Day : लोक सहभागातून नदी प्रदूषणावर मात करणारा गोदावरी नदी संसंद उपक्रम

जागतिक जलदिन

दरवर्षी २२ मार्च या रोजी जागतिक जलदिन साजरा करण्यात येतो. १९९३ पासून संयुक्त राष्ट्र संघाने हा दिवस जागतिक जलदिन म्हणून जाहीर केला. पाण्याच्या दुर्भिक्षाबाबत जागतिक स्तरावरील समस्यांबाबत जनमानसामध्ये जागृती करणे, प्रश्‍नाचे गांभीर्य समजावून सांगणे आणि त्यावर उपाययोजना काय असावी यासाठी या व्यासपीठाचा वापर करण्यात येतो.

जागतिक जलदिनाच्या निमित्ताने आपली भूमिका काय आहे, समाजाची भूमिका काय आहे, प्रशासनाची भूमिका काय आहे? यांच्याबद्दल समजून घेणे आणि त्या अनुषंगाने कृती करणे अगत्याचे ठरते.

संयुक्त राष्ट्र संघाच्या मार्फत प्रत्येक वर्षासाठी काही भूमिका (थीम) जाहीर करण्यात येते. पहिल्या जागतिक जलदिनाला “पाण्याची काळजी घेणे हे प्रत्येकाची जबाबदारी आहे” हे घोषवाक्य होते. त्यानंतर अनुक्रमे प्रत्येक वर्षी नवीन विषय घेण्यात आले. त्यापैकी महत्वाचे विषय...

१९९५ : महिला आणि पाणी

१९९९ : प्रत्येक जण प्रवाहाच्या शेवटच्या टोकाला असतो.

२००० : एकविसाव्या शतकातील पाणी.

२०१४ : पाणी आणि ऊर्जा

संयुक्त राष्ट्र संघामार्फत निवडण्यात येणारे विषय आणि घोषवाक्ये ही समकालीन संदर्भ असलेली असतात. जगाला या विषयाकडे केंद्रित करून चर्चा, संवाद घडतात आणि कृतिशील कार्यक्रमांना चालना मिळते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com