Cashew Orchard Fire Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Orchard Fire : आंबा आणि काजूची झाडे जळून खाक

Mango Orchard : काही दिवसांपूर्वी शहरालगतच्या शीळ परिसरात वणवा लागलेला असताना आता बेनगी आणि शेडेकरवाडी परिसरात लागलेल्या वणव्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंबा व काजू बागायतींचे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : तालुक्यातील बेनगी, शेडेकरवाडी परिसरात लागलेल्या वणव्यामध्ये आंबा आणि काजूची झाडे जळून खाक झाली असून, बागायतदार शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बागांमधून गेलेल्या वीजवाहिन्यांचे स्पार्किंग झाल्यामुळे वणवा लागल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.

काही दिवसांपूर्वी शहरालगतच्या शीळ परिसरात वणवा लागलेला असताना आता बेनगी आणि शेडेकरवाडी परिसरात लागलेल्या वणव्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंबा व काजू बागायतींचे नुकसान झाले आहे.

यामध्ये शेडेकरवाडीतील वासंती वारीशे, प्रकाश पावणाक, गीता शेडेकर, सूर्या पावणाक, संतोष पावणाक, साधना वारीशे, दीपक शेडेकर, राधिका वारीक, अनिता शेडेकर, पार्वती शेडेकर, रामचंद्र शेडेकर, द्रौपदी शेडेकर, गणपत शेडेकर व बापू पावणाक तर बेनगी येथील सुहास नागले व यशवंत नागले यांच्या बागेतील आंबा व काजूची कलमे जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

या नुकसानीचा तलाठ्यांमार्फत पंचनामा करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर शिवसेना तालुकाध्यक्ष श्री. नागले यांनी नुकसानग्रस्त बागांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नागले यांनी संबंधित शेतकऱ्यांना दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Anudan: नांदेडमध्ये कृषी यांत्रिकीकरणातून १२.७० कोटींचे अनुदान वितरित

Raju Shetti: बोगस आणि निकृष्ट खते, कीडनाशकांमुळे आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान, राजू शेट्टींकडून कारवाईची मागणी

Maharashtra Khat Satha: खरिपासाठी १.५० लाख टन युरिया, २५ हजार टन डीएपीचा संरक्षित साठा

Pani Tanchai Upay: पाणी टंचाईवर मात करत पेणच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Bhat Sheti in Maharashtra: सूर्या प्रकल्पामुळे उन्हाळी भातशेती बहरली

SCROLL FOR NEXT